शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जिल्ह्याला भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:54 IST

ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.

ठळक मुद्देरिमझीम पाऊस : गारवा वाढल्याने ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. रविवारी पावसाळी वातावरण तयार होऊन दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत रिमझीम पाऊस बरसत होता. त्यातच बोचरा वारा वाहत होता. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रचंड थंडी निर्माण झाली होती. घराबाहेर निघणारा प्रत्येक जण उबदार कपडे घालूनच बाहेर पडत होता. शहरातील विविध भागात भर दुपारी शेकोट्या पेटल्याचे दृष्य होते. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या होत्या. या अकाली पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. थंडीचा सर्वाधिक त्रास वृद्धांना होत असून सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पाऊस बरसला. या पावसाने भाजीपाला आणि रबी पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. रबी पीके पिवळी पडू लागली आहेत. पालांदूर परिसरात रबीतील उडीद, मुग, लाखोरी आदी पिकांना या अवकाळी पावसाचा लाभ होणार असला तरी बागायतदार शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाने विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.पावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरपावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतरही बाजार समितीने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही. जिल्ह्यातील ६७ पैकी बहुतांश केंद्रांवर सध्या धान उघड्यावर असून शेतकरी आपला धान झाकण्याची धडपड करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर धानाची खरेदी सुरु आहे. त्यात भंडारा तीन, मोहाडी नऊ, तुमसर १५, लाखनी ११, साकोली १२, लाखांदूर १२ आणि पवनी तालुक्यातील पाच केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर शेतकºयांना मूलभूत सुविधा पुरविण्याची सर्व जबाबदारी बाजार समित्यांची आहे. त्याबाबत पणन महासंघाने त्यांना पत्रही पाठविले. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही. विक्रीच्या प्रतिक्षेत असलेले धान ठिकठिकाणी उघड्यावर आहेत. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन सोमवारी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. यामुळे आधारभूत केंद्रात उघड्यावर असलेले धान पुन्हा ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. गत आठवड्याचा अनुभव बघता शेतकरी आपला धान झाकण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा देत नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धानाची दुप्पट खरेदी झाली असून आधारभूत केंद्रावर धान साठविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गोदामही अपुरे पडत आहेत. परिणामी धान खरेदीची गती मंदावली आहे. अनेक शेतकरी १५ ते २० दिवस धान विक्रीच्या प्रतिक्षेत या ठिकाणी दिसून येतात.