भंडारा-साकोली प्रवाशांचे बसभाडे किती?

By Admin | Updated: June 5, 2014 23:50 IST2014-06-05T23:50:35+5:302014-06-05T23:50:35+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परीवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र एसटी महामंडळाच्या प्रवासात आता तिकिटाचे दर वेगवेगळे लागत असल्यामुळे प्रवाशांच्या मनात तिकिटाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

How much is the Bhandara-Sakoli passenger bus? | भंडारा-साकोली प्रवाशांचे बसभाडे किती?

भंडारा-साकोली प्रवाशांचे बसभाडे किती?

भंडारा :   प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परीवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र एसटी महामंडळाच्या प्रवासात आता  तिकिटाचे दर वेगवेगळे लागत असल्यामुळे प्रवाशांच्या मनात तिकिटाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 
दि.१ जूनपासून एसटी विभागातून तिकिट वाढ झाली असली तरी दि.३१ मे २0१४ रोजी नागपूर- लालबर्रा या बसने भंडार्‍याहून साकोली येथे प्रवास केला असता त्यांना तिकिटाचे दर हे ४८ रूपये आकारले. तेव्हाच बसमधील प्रवाशांनी बसच्या वाहकांना विचारले असता तिकीट मशीन मध्ये बिघाड आहे, असे त्यांनी सांगितले. नंतर त्याच दिवशी त्याच प्रवाशांनी साकोली-भंडारा हा प्रवास केला असता तेव्हा त्यांना ४२ रूपयाचे तिकीट आकारले. दुसर्‍या दिवशी म्हणजे दि.१ जूनला प्रवाशांनी प्रवास केला. आजपासून भाडेवाढ झाल्याने ४४ रूपये तिकिट पडले, तर दि.२ जून ला प्रवास केला असता ४३ रूपये भाडे पडले म्हणजेच सलग तीन दिवसात प्रवाशांनी प्रवास केला असता तिनही दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे तिकिटे प्रवाशांना द्यावे लागले. यावरून भंडारा-साकोली या प्रवाशांचे नेमके भाडे किती याविषयी प्रवाशांच्यामनात संभ्रम आहे. याविषयी विषयी इतरही वाहकांना विचारले असता तिकिट मशीनमध्ये बिघाड असल्याने वेगवेगळी तिकिटे पडतात व त्याविषयी आम्ही वरिष्ठांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले परंतु कधी कमी तर कधी जास्त तिकिट घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड पडत आहे. यावर राज्य परिवहन मंडळ लक्ष देईल का, यावर प्रवाशांचे लक्ष लागून आहे.   (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: How much is the Bhandara-Sakoli passenger bus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.