अजून किती बळी घेणार हा रस्ता?
By Admin | Updated: December 31, 2014 23:21 IST2014-12-31T23:21:20+5:302014-12-31T23:21:20+5:30
भंडारा ते देवरी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र वनविभागाच्या परवानगीशिवाय जांभळी ते मुंडीपार हा साडेतीन कि़मी. चा रस्ता तसाच ठेवण्यात आला. या रस्त्यावर अनेकांचे

अजून किती बळी घेणार हा रस्ता?
साकोली : भंडारा ते देवरी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र वनविभागाच्या परवानगीशिवाय जांभळी ते मुंडीपार हा साडेतीन कि़मी. चा रस्ता तसाच ठेवण्यात आला. या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले असून या रस्त्याचे चौपदरीकरण झाले नसले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डेही बुझविले नाही. त्यामुळे हा रस्ता अजुन किती लोकांचे बळी घेणार असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यावेळी वनविभागाच्या आठकाठी धोरणामुळे जंगलातील जांभळी ते मुंडीपार हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता तसाच ठेवण्यात आला. सदर रस्त्यावर खड्डे असून रस्ताही अरूंद आहे.
त्यामुळे या पाच कि़मी. च्या रस्त्याहून वाहन चालविताना वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो.
या रखडलेल्या रस्त्यावरून मोटारसायकल स्वारांना दुचाकी चालविताच येत नाही. त्यामुळे त्यांना मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उतरवून चालवावी लागते. वन विभागाची परवानगी मिळवून रस्त्याची डागडूजी करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)