शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

विशेष रेल्वेच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

कोरोनासोबत जीवन जगायचे तंत्र नागरिकांना गवसले असले तरी रेल्वे विभागाकडून अजून किती दिवस लूट सुरू राहील, असा प्रश्न आहे. वाढलेले तिकिटाचे दर सामान्य केव्हा होतील याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. भंडारा रोड रेल्वेस्थानक हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई-हावडा मार्गावर जलदगतीच्या रेल्वेने प्रवास करण्याकरिता सामान्य तिकीट विक्री बंद आहे. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास आरक्षण केल्याशिवाय शक्य नाही. 

ठळक मुद्देप्रवाशांचा सवाल : तिकीट लागतेय दुप्पट अधिक, प्रवाशांना बसतोय आर्थिक भुर्दंड

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी :  थबकलेली रेल्वेची चाके धावायला लागली आहेत. पण सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासास मनाई आहे. विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट असल्याने साधारण प्रवाशांना घाम फुटत आहे. कोरोनासोबत जीवन जगायचे तंत्र नागरिकांना गवसले असले तरी रेल्वे विभागाकडून अजून किती दिवस लूट सुरू राहील, असा प्रश्न आहे. वाढलेले तिकिटाचे दर सामान्य केव्हा होतील याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. भंडारा रोड रेल्वेस्थानक हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई-हावडा मार्गावर जलदगतीच्या रेल्वेने प्रवास करण्याकरिता सामान्य तिकीट विक्री बंद आहे. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास आरक्षण केल्याशिवाय शक्य नाही. 

प्रवासी म्हणतात...

रेल्वे प्रवास सुरक्षित व आर्थिक बाबतीत परवडणारा आहे. प्रवास करण्याकरिता असलेले निर्बंध हे नागरिकांच्या हिताचे आहेत. कठीण काळ बघता सरकारने प्रवासबंदीच्या नियमात शिथिलता आणावी. सामान्य प्रवासाकरिता प्रवास निर्बंध विरहित करून जनजीवनाची घडी रुळावर येण्यास मदत करावी.-गणेश हिंगे, सामाजिक कार्यकर्ते 

सध्याच्या स्थितीत रेल्वे आकारत असलेले प्रवासी भाडे दुपटीपेक्षा जास्त आहे. तिरोडा तालुक्यातील एका खेडेगावातून वरठी सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामावर येतो. पुर्वी लोकसाठी दहा रुपये द्यावे लागायचे. आता ३० रुपये मोजावे लागतात. यामुळे आमचे बजेट कोलमडले आहे.-मानसिंग हिरापुरे, प्रवासी.

तिकीट किमती दुपटीपेक्षा जास्तमुंबई-हावडा मार्गावर अप-डाऊन धावणाऱ्या ३४ रेल्वे गाड्या सुरू आहेत. यात ३ साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-इतवारी मार्गावर एकमेव सर्वसाधारण लोकल गाडी धावते. लोकल गाडीने प्रवास करण्यास निर्बंध नाहीत. पण कार्यालयीन किंवा व्यावसायिक दृष्टीने प्रवास करण्यास ती रेल्वे गाडी सोयीची नाही. 

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी रेल्वे विभागाकडून आरक्षणाच्या नावावर होणारी पिळवणूक बंद करण्याची मागणी येथील व्यापारी सुधीर बागडे यांनी केली आहे. सुधीर बागडे यांचे जनरल दुकान असल्याने त्यांना आठवड्यातून दोन-तीन वेळा नागपूर व गोंदिया येथे खरेदीला जावे लागते. कधी कधी जाणे ठरवून नसते. ग्राहकांच्या मागणीनुसार धावत-पळत खरेदीला जावे लागते. पण आरक्षणाचे निर्बंध असल्याने व्यवसायात नुकसानाला सामोरे जावे लागते. कोविडमुळे व्यवसाय डबघाईस आले असताना एखादी संधी मिळाली तरी रेल्वेच्या आरक्षण निर्बंधाने लाभ घेता येत नाही.

 

टॅग्स :railwayरेल्वे