शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:22 IST

जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलने होणार, .......

ठळक मुद्देपत्रपरिषद : धरणातील पाण्यात विषारी द्रव्याचे घटक वाढले, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलने होणार, त्यासाठी शासन प्रशासनाने याची त्वरित दखल घेवून नागनदीचे पाणी दुसरीकडे वळवावे, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील सभ्य नागरिकांकडून केली जात आहे. आता दि. १९ जून २०१९ पासून अर्ध दफन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवाशक्ती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातील संजीवनी असलेली वैनगंगा नदीचे पाणी दुषित होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना दुषित पाणी पेणे भाग पडत आहे. त्यासाठी २००९ पासून शासनाचे लक्ष वेधन्यासाठी येथील युवाशक्ती संघटनेच्या वतीने विविध मोर्चे व आंदोलने करण्यात आले परंतू संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन आश्वासनाची खैरात शिवाय काही उपाययोजना न झाल्यामुळे अजून किती आंदोलन करावे लागेल असे प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरणारा गोसे खुर्द प्रकल्प बांधण्यात आले आहे. ह्या प्रकल्पात २००९ पासून पाणी साठविणे सुरू आहे. धरणामध्ये नागपूर शहरातील मलमुत्र युक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता कन्हान नदी मार्गे वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. ते दुषित पाणी धरणात येवून जमा होते. दररोज सुमारे ४२० दशलक्ष लिटर प्रतिदीन प्रदुषित पाण्याचा साठा धरणात येतो. धरणातील पाण्यात विषारी द्रव्याचे घटक प्रमाण वाढले असून पाण्यामधील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे मासे उत्पादनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. धरणातील संपूर्ण पाणी काळ्या रंगाचा झालेला असून दुर्गंध युक्त आहे. आता तेच पाणी तालुक्यातील जनतेला पेणे भाग पडत आहे. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आदी अनेक रोगांचा प्रभाव अनेक वषार्पासून होत आहे. मानव, शेती, वृक्ष, प्राणी व पर्यावरणावर याचा विपरित परिणाम होत आहे. परंतू या सर्व बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून जीवनमाना सोबत खेळत असल्याने १९७४ च्या जलकायदा नुसार संबंधित विभागावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शासनविरोधी धोरणामुळे वैनगंगा नदीच्या पाण्यात सोडणारे नागनदीवर जलसुद्धीकरण यंत्र बसवून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पून्हा युवाशक्ती संघटनेने पुढाकार पुकारले असून दि.१९ जून ला दुपारी ३ वाजता पासून अर्धदफन आंदोलन पूकारण्यात आले असून या आंदोलनात शेकडाच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत देवराज बावनकर, दिपक बावनकर, प्रशांत मोहरकर, गोपाल काटेखाये, प्रकाश पचारे, रमेश शिवरकर आदींनी केली आहे.इकॉर्नियामुळे वैनगंगा दूषितभंडारा : शहरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी इकॉर्निया फोफावली आहे. वाºयाच्या झुळकीसोबत इकॉर्निया पसरत असल्याने पाणी दूषित होत आहे.भंडारा शहराची वैनगंगा जीवनदायी म्हणून ओळखली जाते. याच नदीवर पाणीपुरवठा योजना आहे. मात्र गत काही दिवसांपासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात इकॉर्निया फोफावत आहे. या वनस्पतीमुळे नियमित जलतरणासाठी जाणाऱ्या तरुणांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नदीतील मासे बऱ्याच प्रमाणात मृत्यूमुखी पडल्याचेही दिसून येत आहे. तसेच इकॉर्निया सोबत केरकचराही येत असल्याने पाणी दूषित होत आहे.