घरगुती सिलिंडरचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:36 IST2019-07-15T23:36:28+5:302019-07-15T23:36:42+5:30
चहा बनविण्यासाठी गॅस पेटविताच रेग्युलेटरला क्षणात आग लागली. कळण्याच्या आतच या आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र तरूणतुर्क मुलाने धाव घेत पेटता सिलिंडर घराबाहेर नेला. आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. ही घटना शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात रमेश भोंदे यांच्याकडे घडली.

घरगुती सिलिंडरचा भडका
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : चहा बनविण्यासाठी गॅस पेटविताच रेग्युलेटरला क्षणात आग लागली. कळण्याच्या आतच या आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र तरूणतुर्क मुलाने धाव घेत पेटता सिलिंडर घराबाहेर नेला. आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. ही घटना शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात रमेश भोंदे यांच्याकडे घडली.
सकाळी ६ वाजताच्या सुमारास भोंदे यांच्या पत्नी या चहा बनविण्यासाठी स्वयंपाकगृहात गेल्या. लायटरने बर्नरला पेटविताच क्षणातच रेग्युलेटरलाही गॅस लिकेजमुळे आग लागली. याचवेळी त्यांनी आरडा ओरड केल्याने त्यांचा मुलगा प्रवीण धावत आला. स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवीणने पेटता सिलिंडर घराच्या बाहेर काढला. यावेळी सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ निघत होते. पाणी, ओली वाळू, पाण्याने भिजलेली पोती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग विझली नाही. याचवेळी गावातील रहिवासी नरेंद्र पालांदूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अग्नीशमन बंब पाठविले. त्यानंतर आग आटोक्यात आली. ३० ते ३५ मिनिट सिलिंडरमधून आगीचे लोळ बाहेर निघत असल्याने सर्वांचा जीव टांगणीला होता. घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे. यासंदर्भात सदोष गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांवरही कारवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.