धानाचे गोडावून झाले हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:40 IST2018-05-16T22:40:46+5:302018-05-16T22:40:46+5:30
खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग विभागाने केली आहे. यामुळे सिहोरा परिसरातील धानाचे गोडाऊन हाऊसफुल्ल आहे. उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचण येणार आहे.

धानाचे गोडावून झाले हाऊसफुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग विभागाने केली आहे. यामुळे सिहोरा परिसरातील धानाचे गोडाऊन हाऊसफुल्ल आहे. उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचण येणार आहे.
सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पीक शेतकरी घेत आहेत. या परिसरात धानाचे विक्रमी उत्पादन होत आहे. यामुळे पाच कि.मी. अंतरावर धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. धानाचे उत्पादन होत असताना नवीन गोडावूनची निर्मिती शासनस्तरावर करण्यात येत नाही. शासकीय दरात खरेदी करण्यात आलेल्या धानाला संरक्षण देणारे उपाय योजना अपुरे ठरत आहेत. या साधनाचे अभावाने अवकाळी पावसाचे कचाट्यात धानाचे उघड्यावर ठेवण्यात येणारी पोती सापडत आहेत. काही धानाच्या पोतीची नासाडी होत आहे. या परिसरात बपेरा, चुल्हाड, वाहनी, सिहोरा आणि हरदोली गावात खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यात आली आहे.
दी सहकारी राईस मिल सिहोराचे हद्दीत असणारे चार गोडावून धानाचे पोतीनी हाऊसफुल्ल आहे. या गोडावूनमध्ये १३ हजार ८०८ क्विंटल धानाची पोती पडून आहेत. बपेरा गावात ४ हजार पोती हरदोली गावात २ हजार पोती गोडावूनमध्ये आहेत. यामुळे उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचणीची ठरणार आहे. सध्या स्थिती उन्हाळी धानाची खरेदी शासकीय खरेदी केंद्रावर सुरु करण्यात आली आहे. परंतु या केंद्रावर शेतकºयांनी धानाची विक्री करण्यासाठी आवक सुरु केली आहे. त्यांची पोती उघड्यावर पडून आहेत. दरम्यान वारंवार वातावरणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. उघड्यावर असणाºया धानाचे पोतींना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकºयांच्या धानाला सुरक्षा कवच देणारे उपाययोजना करण्यात येत नाही. बहुतांश गावात गोडावून नाही. प्रत्येक गावात धानाचा पट्टा असताना या गावात धानाचे गोडावून निर्माण करायला पाहिजे. या गोडावूनची निर्मिती ग्रामपंचायत मार्फत समाज भवनाचे धर्तीवर करण्याची आवश्यकता आहे.
चार ही गोडावून धानाचे पोतींनी हाऊसफुल्ल आहेत. यामुळे उन्हाळी धानाचे पोती ठेवताना अडचणी वाढणार आहे. जिल्हा मार्केटिंग विभागाने याकडे लक्ष देवून पाऊल उचलले पाहिजे.
-सुभाष बोरकर, उपाध्यक्ष दि सहकारी राईस मिल, सिहोरा.