पांढराबोडी येथे आगीत घर भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:45+5:302021-04-08T04:35:45+5:30
भंडारा : मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथे एका घराला आग लागून संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास ...

पांढराबोडी येथे आगीत घर भस्मसात
भंडारा : मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथे एका घराला आग लागून संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, डब्यात असलेली रोख रक्कमही जळाली.
पांढराबोडी येथील रवी यादव नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबासह झोपी गेले होते. बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घरी बांधलेली शेळी जोराने ओरडायला लागली. त्यामुळे रवीला जाग आली. उठून पाहतात तर काय घराला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने गावकरी जागे झाले. मिळेल त्या साहित्याने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला.
मात्र काही वेळातच संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले. त्यामुळे यादव परिवार उघड्यावर आला आहे. सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
या आगीत एका डब्यात असलेली रोख रक्कम आणि बँकेचे पासबुकही जळाले. या आगीमुळे यादव कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती तहसील प्रशासनाला देण्यात आली. कुटुंबाला तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.