तीन एकरातून फुलविली बागायती शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:55+5:30
संचारबंदी अंतर्गत घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना या भाजीपाल्यांची विक्रीही केली. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांनाही याचा फायदा झाला. संचारबंदीच्या काळात ग्राहकांना ताजे व सेंद्रीय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने भाजीपाल्याची मागणीही वाढली.

तीन एकरातून फुलविली बागायती शेती
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : योग्य नियोजन व मेहनतीच्या भरवशावर एका तरुणतुर्क शेतकºयाने अवघ्या तीन एकरात बागायती शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांनाही याद्वारे आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील स्वप्नील शंकरराव नंदनवार असे या प्रगतशील शेतकऱ्यांचे नाव आहे.
स्वप्नीलने त्याच्या वडीलोपार्जीत शेतात सेंद्रीय शेतीला प्राधान्य देत बागायती शेतीची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. बागायत शेतीतून निघणाºया हिरव्या भाजीपाल्याला पालांदूर परिसरातील १५ किलोमीटर पर्यंतच्या गावातील नागरिकांची मागणी असल्याचे दिसून येते. आधुनिक शेतीतून आर्थिक उलाढाल कशी करता येईल याचे उत्तम उदाहरणही स्वप्नीलने दिले आहे. अल्प जागेतून उत्तम उत्पादन कसे घेता येईल हे पटवून देण्यासाठी त्याने बागायती शेतीचा संकल्प सोडला.
कारले, भेंडी, काकडी, पालक, कांदे, चवळी, वांगी, भोपळा या पिकांना मोठी मागणीही मिळाली.
संचारबंदी अंतर्गत घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना या भाजीपाल्यांची विक्रीही केली. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांनाही याचा फायदा झाला. संचारबंदीच्या काळात ग्राहकांना ताजे व सेंद्रीय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने भाजीपाल्याची मागणीही वाढली.
थेट ग्राहकांना विक्री
सुरुवातीला तीन एकर शेतात बागायती शेती करण्यास सुरुवात केली. आंतरपीक निघण्यास प्रारंभही झाला. त्याची फलश्रूती आता दिसू लागली आहे. शेतातून काढलेले पीक दलाल अथवा व्यापाºयांच्या हातात दिले तर तुटपुंज्या पैशावर समाधान मानावे लागते. त्यामुळे स्वप्नीलने मध्यस्थापर्यंत आपला भाजीपाला न देता थेट ग्राहकांनाही विकण्यास सुरुवात केली.