बेवारस गार्इंच्या शिंगाना लावले भगवे रेडीयम

By Admin | Updated: August 30, 2016 00:25 IST2016-08-30T00:25:26+5:302016-08-30T00:25:26+5:30

शहरातील अनेक मार्गांवर मोकाट गाई फिरत असतात. तसेच रस्त्याच्या मधोमत बसून ही जनावरे रहदारीला अडथळा निर्माण करतात.

The hornless carpeted horns are called saffron radium | बेवारस गार्इंच्या शिंगाना लावले भगवे रेडीयम

बेवारस गार्इंच्या शिंगाना लावले भगवे रेडीयम

नवीन उपक्रम : युवा सेना व विद्यार्थी सेनेचा संयुक्त उपक्रम
गोंदिया : शहरातील अनेक मार्गांवर मोकाट गाई फिरत असतात. तसेच रस्त्याच्या मधोमत बसून ही जनावरे रहदारीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अपघाताची नेहमीच शक्यता असते व अनेकदा अपघातात जीवित हानीसुद्धा झाली आहे. ही बाब लक्षात घेवून युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अशा बेवासर गार्इंच्या शिंगांना भगवे रेडीयम लावण्यात आले आहे.
भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक प्रशांत कोरे, युवा सेनेचे उपजिल्हा संघटक हिमांशू कुथे व युवा सेनेचे तालुका युवाअधिकारी अभय मानकर यांच्या नेतृत्वात अपघातापासून वाचण्यासाठी रस्त्यावर फिरणारे व बसलेल्या जनावरांच्या सिंगांना भगवा स्टीकर लावण्याची दोन दिवसीय मोहीम राबविण्यात आली. यात बहुतांश गार्इंचा समावेश आहे.
आमगाव मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाटवरी कटंगी नाका, पाल चौक, कुडवा नाका, टी पॉर्इंट तसेच शहरातील प्रमुख रस्ते ज्यावर गार्इंचा कळप मोठ्या प्रमाणात राहते अशा रस्त्यांवरील गार्इंच्या शिंगांना भगवा रेडीयम स्टीकर लावण्यात आले. भगवा रेडीयममुळे वाहनांचा प्रकाश पडताच जनावर समोर असल्याचा संकेत वाहन चालकांना मिळेल व अपघात टळेल.
याप्रसंगी विकास नागरिकर, राहुल नागपुरे, भुपेंद्र नाकाडे, गोविंदा मिश्रा, मनोज बुधवानी, खुशाल निंबाळकर, संदेश निंबाळकर, विनायक मेंढे, अमन हरिणखेडे, सोहन शेंद्रे, अनूप माणिकपुरी, योगेश बेलगे, रितेश चोरनेले, प्रशांत यादव, युवा सेना व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अपघात टाळा
गोंदिया शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना व सर्वाधिक आढळणाऱ्या गार्इंच्या सिंगांना सेनेच्या कार्यकर्त्यांंी रेडीयमचे स्ट्रीकर्स लावले. यामागे शहरात अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व रहदारी व्यव्स्थित व्हावी हा हेतू होता. तरी शहरातील अनेक भागात अद्यापही असे अनेक जनावरे आहेत ज्यांच्या शिंगांना रेडीयम लागले नाही. त्यामुळे ही मोहीम पुन्हा राबविण्याची गरज आहे.

Web Title: The hornless carpeted horns are called saffron radium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.