हुडहुडीने ग्रामीण भागात 'शेकोटी' पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:07 IST2018-01-03T22:07:11+5:302018-01-03T22:07:54+5:30

आबालवृद्धांना थंडीचा त्रास तर गावात शेकोटीचा जोर. दोन महिने झाले हिवाळा सुरू होवून मात्र नवीन वर्ष लागताच थंडीचा जोर वाढल्याने .....

Hoodhudaya 'fireplace' in rural areas | हुडहुडीने ग्रामीण भागात 'शेकोटी' पेटली

हुडहुडीने ग्रामीण भागात 'शेकोटी' पेटली

ठळक मुद्देआबालवृद्ध त्रस्त : आजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ, वातावरणाने पिकांना धोका

आॅनलाईन लोकमत
आंधळगांव : आबालवृद्धांना थंडीचा त्रास तर गावात शेकोटीचा जोर. दोन महिने झाले हिवाळा सुरू होवून मात्र नवीन वर्ष लागताच थंडीचा जोर वाढल्याने आंधळगाव परिसरातील सर्व ग्रामीण भागात थंडीची हूडहूडी भरल्याचे चित्र दिसत आहेत, त्यामुळे गावे सुन्न होवून प्रत्येक घरी, चौकात शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे.
ग्रामीण भागात रूम हिटरची व्यवस्था शुन्य असल्याने शेतकरी, मजूर व इतर गृहिणी हे घरी असणाºया सरपणाच्या काड्यांचा गठ्ठा तयार करून शेकोटीसाठी दुपारी शेत-शिवारात जावून जमा करतात. वातावरणाने १५ दिवसापासून आपले रंग बदलवून वेगळा ढगाळ वातावरण तयार केल्याने शेतकरी रब्बी पिकावर रोगाचा प्रादूर्भाव होईल. या चिंतेत होता. अगोदरच खरीप हंगामाच्या धान पिकाने शेतकºयांचे वेळेवर हातात येणारे धानपिक हिसकावून घेतले. सध्या मात्र आभाळ स्वच्छ होत असल्याने थंडी वाढू लागली आहे व अचानक चार-पाच दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने पहाटे, रात्री तर दिवसभर थंडीचा गारवा वाढला आहे.
हिवाळ्यात काही दिवस अशीच थंडी राहिली तर यावर्षी रब्बी पिक हंगाम चांगला राहिल, अशी आशा शेतकºयांना आहे. पिकासाठी सध्याची थंडी पोषक असल्याने तुर, चणा, हरभरा, मुंग, गहू या पिकांची चांगली आवक होईलही आशा शेतकऱ्यां ना आहे तर ही थंडी आबाल, वृद्धांना, लहान बालके, दमा रुग्ण, हड्डीजोड रुग्ण यांना घातक ठरू शकते. त्यामुळे बरेच आबालवृद्ध डॉक्टरांच्या दवाखान्यात ये-जा करताना दिसतात तर थंडी वाढल्याने कृषी केंद्रधारक रब्बी पिकासाठी रासायनिक खताची मागणी करीत आहेत तर जनता थंडीच्या बचावासाठी शेकोटीचा सहारा घेत आहेत.

Web Title: Hoodhudaya 'fireplace' in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.