राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:42+5:302021-04-01T04:35:42+5:30
स्पर्धेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, विभाग अध्यक्ष सतीश सोमकुवर, सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, ...

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
स्पर्धेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, विभाग अध्यक्ष सतीश सोमकुवर, सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नाशिक चवरे, उपाध्यक्ष तथा संयोजिका उषा घोडेस्वार, उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाणे होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या काव्य स्पर्धेला परीक्षक म्हणून कवी नरेंद्र गुळघाणे होते. स्पर्धेला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४० कवी, कवयित्री यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये सर्वोकृष्ट काव्य म्हणून इंद्रकला बोपचे यांच्या काव्याची निवड करण्यात आली. उत्कृष्ट काव्यामध्ये राकेश डाफळे, गंगाधर यावले, नीरज आत्राम, आनंद कुमार शेंडे, किरण पेठे, प्रतीक्षा नांदेडकर, यांच्या काव्यांच्या समावेश आहे. प्रथम क्रमांक संगीता बोरसे, द्वितीय संगीता बांबोळे, नंदा परदेशी, दीपाली मारोटकर. तृतीय क्रमांक संदीप तोडकर, विजया शिंदे, स्वीटी नारनवरे, सुनंदा पाटील, भारती तिडके , नितीन खंडाळे यांनी पटकाविला. ६५ कवी, कवयित्री यांना परिषदेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सहभागी कवी,कवयित्री यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.