वाचनालयाच्यावतीने गुणवंतांचा सत्कार
By Admin | Updated: August 1, 2016 00:25 IST2016-08-01T00:25:38+5:302016-08-01T00:25:38+5:30
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मार्च २०१६ च्या दहाव्या वर्गाच्या परिक्षेत ९२ टक्के, १२ व्या वर्गाच्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, ...

वाचनालयाच्यावतीने गुणवंतांचा सत्कार
सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम : बक्षीस प्राप्तीनंतर भारावले विद्यार्थी
भंडारा : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मार्च २०१६ च्या दहाव्या वर्गाच्या परिक्षेत ९२ टक्के, १२ व्या वर्गाच्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, सीबीएससी पॅटर्नच्या १० व्या वर्गाच्या परिक्षेत ९५ टक्के व १२ वी च्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, १२ वी च्या जिवशास्त्र व इंग्रजी विषयात भंडारा शहरातून प्रथम व १० वी व १२ वी च्या परिक्षेत मागासवर्गीय एस.सी. प्रवर्गातून भंडारा शहरातून सर्वात जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार सार्वजनिक वाचनालय येथील इंद्रराज सभागृहात करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते.
यावेळी शहरातील जेष्ठ शिक्षक मनोहरराव बोंगीरवार यांचा, छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन दाढी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शहरात प्रथम आल्याबद्दल कै. दशरथराव जागेश्वरराव गिऱ्हे, कै. भाऊसाहेब दलाल कै. शालिनीताई वसंतराव माटुरकर, सौ. मिना शालिकराम कुलरकर रौप्य पदक, राजन भवरे जिल्हाधिकारी यांचेकडून संगणक पुस्तक भेट व वाचनालयाकडून स्मृती भेट देवून १२ वी च्या केतकी पदवाड व १० वीच्या हर्षदा परमारे यांचा सत्कार करण्यात आला. मागासवर्गीयातून १२ वी मधून सोनल शहारे व १० वी मध्ये जान्हवी मेश्राम भंडारा शहरात प्रथम आल्याबद्दल कै. बायाबाई पांडुरंग बागडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रौप्य पदक देवून सत्कार करण्यात आला.
१२ व्या वर्गात भंडारा शहरात इंग्रजी विषयात पायल पंचभाई सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल कै. निलकंठराव नानासाहेब कठाळे रौप्य पदक व जीवशास्त्र विषयात कुणाल ज्ञानदेव टेंभुर्णे हिला कै. मनिष चंदेल रौप्य पदक व वाचनालयाकडून स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. अभ्यासिका व संदर्भ विभागाचा लाभ घेवून शासकीय सेवेत रुजू झालेल्या धर्मपाल खोब्रागडे व सुमेध गोस्वामी यांच्यासह एकुण १०४ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. जयंत आठवले व आभार विनोद मेश्राम यांनी केले. (नगर प्रतिनिधी)