जिल्हा रूग्णालयात परिचारिकांचा गौरव
By Admin | Updated: May 18, 2016 00:37 IST2016-05-18T00:37:51+5:302016-05-18T00:37:51+5:30
जिल्हा रुग्णालय भंडारा येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा रूग्णालयात परिचारिकांचा गौरव
भंडारा : जिल्हा रुग्णालय भंडारा येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक आ. रामचंद्र अवसरे याच्या हस्ते पाहुणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनीता बडे व डॉ. पीयूष जवकाळ होते.
यानंतर परिचारिकातर्फे नाट्यछटा सादर करण्यात आली. विषय परिचर्या आणि त्याची व्याप्ती यामध्ये रंजना नंदनवार, भावना सुर्यवंशी अ.प. सोनाली फटकाळ व परिचारिका प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. परिचारिका व प्रशिक्षणार्थींना बक्षीस वितरण प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. रांगोळी स्पर्धा सीमा कुरई प्रथम, मोनाली काटवले व दिव्याश्री चव्हाण द्वितीय. पोस्टर स्पर्धा कामिनी पुडके, रंजना नंदनवार. स्लोगन स्पर्धा पुष्पा उईके, रंजना नंदनवार. निबंबध स्पर्धा संतोष धानोरे, कामिनी पुडके. प्रश्न संच आशा टांगले, सचिन साठवणे संचालन मोनिका नाहर पाठ्य निर्देशिका यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत प्लोरेंन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांचे संचालन व प्रास्ताविक चंद्रकुमार बारई जिल्हा समूह संघटक यांनी केले. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका, आरोग्य सहायीका व अधिपरिचारिका ते अधिसेविका यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वरूपात अनुक्रमे रूपये ४०००, ३००० व २००० तसेच सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये आरोग्य सहायीका एलएचव्ही पुष्पा मेश्राम, प्रा. आ. केंद्र सरांडी प्रथम क्रमांक, कविता चोपकर प्रा. आ. केंद्र वरठी द्वितीय क्रमांक, डी.एन. टेंभुर्णीकर प्रा. आ. केंद्र विर्शी तृतीय क्रमांक यांना मिळाला तर आरोग्य सेविका प्रथम क्रमांक अश्विनी एल बांते, उपकेंद्र लाखोरी प्रा.आ. केंद्र सालेभाटा. द्वितीय क्रमांक वी.डी. भारती, उपकेंद्र वाकेश्वर प्रा. आ. केंद्र पहेला, तृतीय क्रमांक एन.एन. वंजारी उपकेंद्र मानेगाव प्रा. आ. केंद्र पहेला यांना मिळाला. अधिपरिचारिका ते अधिसेविका या संवर्गातून वत्सला मानमोठे सहायक अधिसेविका जिल्हा रुग्णालय भंडारा प्रथम, विशाखा बोरकर अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय पवनी द्वितीय, पुष्पा गिरीपुंजे परिसेविका जिल्हा रुग्णालय भंडारा तृतीय यांना मिळाला. कार्यक्रमाला प्रकाश बालमांदरे, सचिन मते यांनी सहकार्य केले. सुनिता बडे यांनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू संपन्न असे म्हणून परिचारिकांची प्रशंशा केली. आ. अवसरे म्हणाले, परिचारिका की देवदुतासारखी आहे. रुग्ण हे तिच्या मोठ्या व लहान भावासारखे आहेत. तिचे कार्य समाज मान्य असून ती रात्रंदिवस कष्ट करून सेवा देणारी देवदूत आहे. संचालन आशा टांगले यांनी केले. आभार प्रदर्शन भावना सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. वत्सला मानमोठे, वीणा पाटील, मोनिका नाहर, रेखा गिरी, ज्योती चौधरी, मंजुषा नेवारे, रेखा वासनिक, मायादेवी वासनिक, साधना नाग, पुष्पा उईके, सचिन साठवणे, परिक्षक म्हणून डॉ. प्राची पातुरकर, डॉ. ज्योती कुकडे, अहारतज्ञ विनीता चकोले हे होते. (प्रतिनिधी)