रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

By Admin | Updated: April 21, 2016 00:28 IST2016-04-21T00:28:02+5:302016-04-21T00:28:02+5:30

रेल्वे स्थानकावरील फलाटावर मद्यधुंद अवस्थेत अस्ताव्यस्त झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात २६ हजार रुपये असल्याचे ...

The honesty of the railway police | रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

देव्हाडी रेल्वे स्थानकातील घटना : २६ हजार रूपये परत केले
राहुल भुतांगे तुमसर
रेल्वे स्थानकावरील फलाटावर मद्यधुंद अवस्थेत अस्ताव्यस्त झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात २६ हजार रुपये असल्याचे गस्तीवर असलेल्या जवानाला दिसल्याने त्याने त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलावून त्याच्याकडे मिळालेली २६ हजार रुपयाची रोख रक्कम परत करून औदार्य दाखविले.
रात्री ८.३० च्या सुमारास गोंदिया मेमो ट्रेन तुमसर रोड देव्हाडी रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर तुमसर रोड रेल्वे पोलीस चौकीचे अमर ढबाले नामक जवान प्लेट फार्म नं. २ वर गस्त घालत असताना अंधाराच्या आडोशाला एक ३५ वर्षीय इसम दारुच्या नशेत झोपलेला दिसला. त्या इसमाला त्याने उठविण्याचा बराच प्रयत्न केला.
परंतु तो काहीच हालचाल करीत नसल्याने ढबाले यांनी त्या इसमाचे खिसे तपासले. त्याच्याकडे एकूण २६ हजार ५४० रुपये रोख होते व मोबाईलही दिसताच ढबाले यांनी त्या इसमाच्या नातेवाईकांना त्याच्या नंबरने फोन करून देव्हाडी रेल्वे स्थानकावर लगेच निघून या असा संदेश दिला.
इसमाच्या नातेवाईक नामे बाबूलाल नरमद लिल्हारे (४५) रा. टेमनी (जि.बालाघाट) हा व त्याचे सहकारी तथा भौरगण पंचायत समितीचे सभापती प्रकाश चुन्नीलाल उके यांनी त्याच रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तुमसर रोड (देव्हाडी) रेल्वे स्थानक गाठले. तिथे तेजलाल हरपाल लिल्हारे (३५) रा.भोरगड हा नशेत झोपलेल्या अवस्थेत दिसला.
नातेवाईकांनी त्याला उठविण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्यामुळे त्याच अवस्थेत त्याला घेून जाण्याचा निर्णय घेतला. तेजपाल लिल्हारेच्या खिशात मिळालेली रक्कम व मोबाईल तेजपालच्या नातेवाईकांना देताच तेजपालच्या नातेवाईकांचे डोळे पाणावले. आजच्या काळात एकीकडे पैशासाठी मारामारी प्रसंगी हत्याही केली जाते ; मात्र अमर ढबाले या पोलीस शिपायाने प्रामाणिकपणा दाखवून माणुसकीचा परिचय करून दिला आहे.

Web Title: The honesty of the railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.