प्रामाणिक प्रयत्न यशाचे प्रथम पाऊल
By Admin | Updated: February 25, 2016 00:31 IST2016-02-25T00:31:09+5:302016-02-25T00:31:09+5:30
कुठल्याही क्षेत्रात मिळणारे यश हे प्रयत्नावर अवलंबून असते. शालेय जीवनात प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न म्हणजे यशाचे दिशेने जाणारे प्रथम पाऊल आहे.

प्रामाणिक प्रयत्न यशाचे प्रथम पाऊल
वरठीत कार्यक्रम : धीरजकुमार यांचे प्रतिपादन
वरठी : कुठल्याही क्षेत्रात मिळणारे यश हे प्रयत्नावर अवलंबून असते. शालेय जीवनात प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न म्हणजे यशाचे दिशेने जाणारे प्रथम पाऊल आहे. कुठल्याही गोष्टी मिळवताना त्रास होईल पण त्या मिळवण्यासाठी सहजासहजी वापरले जाणारे शॉर्टकट फार काळ टिकत नाही. यशाचे रहस्य प्रामाणिक प्रयत्नात असून पालकांनी आपल्या पाल्याना प्रोत्साहन द्यावे, पालकांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी दडपण न देता प्रयत्नावर लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. तथागत पब्लिक स्कूलच्या शालेय वार्षिक उत्सवात ते बोलत होते.
उद्घाटन पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांच्या हस्ते व प्राध्यापक विद्या मेश्राम यांच्या अध्यक्षतेत झाले. पाहुणे म्हणून सरपंच संजय मिरासे, जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके, उपसरपंच मिलिंद रामटेके, अरविंद कारेमोरे, सेवक कारेमोरे, पुष्पा भुरे, राकेश गजभिये व अश्ववीर गजभिये, प्रा. बबन मेश्राम उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विनीता शाहु म्हणाले विद्यार्थ्याने काय बनावे या मागे न लागता तो चांगले काय करू शकतो याकडे लक्ष द्यावे. एखाद्या शेजाराच्या मुलाने हे केल म्हणून ते तु कर असा आग्रह न करता विद्यार्थ्यात असलेल्या गुणाच्या आधारावर त्याचे क्षेत्र निवडावे.
यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रावणी मेश्राम, कोशा उताणे, अनन्या डोंगरे, आनिया खरवडे, याशी गडेवाल, माही चांद यांनी सादर केलेले नृत्य आकर्षक ठरले. मुली-वाचवा देश वाचवा यासह स्वच्छ भारत सुंदर भारत असा संदेश नृत्याच्या माध्यमातून देण्यात आला. प्रमुख पाहुण्याचे स्वागत नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी केले. महाराष्ट्राचे पारंपरिक ढोल व देशभक्ती गीतावर सादर झालेल्या संगीतावर आयुष मांडवे, दिव्येश मेंढे, श्रवण हरकंडे, प्रतीक्षा मुळे, भाविका फुंडे, कोशा उताणे व आदीत्य टिचकुले यांनी प्रेक्षक व प्रमुख पाहुण्याचे मनोरंजन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित पे्रक्षकांची मने जिंकली.
संचालन पद्मिनी दास, प्रास्ताविक प्राचार्य तथागत मेश्राम व आभार पूजा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास विवेक ढोक, बबिता रहांगडाले, वैशाली सेलोकर, वैशाली राऊत, मीरा चाचेरे, सोनाली लिचडे, पुजा बोंदरे, तृप्ती वैद्य, वैशाली टांगले, अरुणा बांगरे, सविता चकोले, अम्बलीला भुरे, शीतल पंचभाई, माया वांद्रे, कुंदा लोहबरे, सुनंदा वैद्य, करण सिंग, सुनंदा बन्सोड, कमलेश पाटील, धीरज घोडके, अर्चना सार्वे उपस्थित होते. (वार्ताहर)