पावसाकरिता होमहवन, पर्जन्ययज्ञ
By Admin | Updated: July 5, 2014 00:19 IST2014-07-05T00:19:08+5:302014-07-05T00:19:08+5:30
चिचोली येथे श्री सिद्ध सिद्धेश्वर मारोती देवस्थान येथे नुकतेच चिचोली येथे ...

पावसाकरिता होमहवन, पर्जन्ययज्ञ
आंधळगाव : चिचोली येथे श्री सिद्ध सिद्धेश्वर मारोती देवस्थान येथे नुकतेच चिचोली येथे बजरंग धाम आश्रमचे प्रमुख स्वामी रुद्रनाथ उर्फ प्रा. विपिन धनराज मेश्राम यांच्या हस्ते यावर्षी चांगले पीक व चांगले पर्जन्य येऊन बळीराजा सुखावला पाहिजे, याकरीता स्वामी रुद्रनाथ यांनी मारोतीरायांना व इंद्रदेवता व वरुणदेवता यांना साकडे घातले. त्याकरीता पर्जन्ययज्ञ केले व होमहवन केले. त्याचप्रकारे सामुदायिक प्रार्थना केली.
सामुदायिक प्रार्थनेतून ईश्वराला लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे व बळीराजाचे लवकरात लवकर संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी नांदू दे असे आव्हान इंद्रदेवतांना केले. स्वामीजी पुढे म्हणाले, जेवढे प्रमाणात वृक्षकटाई होती तेवढ्या प्रमाणात वृक्षांची लागवड होत नाही.
पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यापुढे प्रत्येक शेतकऱ्याने आपआपल्या शेतात एकतरी झाड लावण्याचा व त्याला जोपासण्याचा संकल्प करावा. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, ‘वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे’ पर्यावरणाचा समतोल म्हणजे पावसाचा समतोल आहे. त्याचप्रकारे होमहवन केल्यानेही चमत्कार होतो असे म्हणून होमहवनाची सांगता झााली. पर्जन्य यज्ञामध्ये चिंतामणी टिकापाचे, गुरु माने, देवा माने, लक्ष्मण, श्यामराव दामू माने, नागो, बडवाईक, त्रिदेव, जयदेव, शंकर, प्रवीर, नितीन, मुकेश, सचिन, गजराज या भक्तांनी सहभाग घेतला होता. (वार्ताहर)