नवीन वर्षात घर महागले

By Admin | Updated: January 5, 2015 22:58 IST2015-01-05T22:58:12+5:302015-01-05T22:58:12+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही जमिनीच्या शासकीय दरात वाढ झाली आहे. नवीन वर्षात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार महागले आहेत. शहरात ही वाढ १२ ते १४ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १८ ते २० टक्के इतकी आहे.

Home Expenses In New Year | नवीन वर्षात घर महागले

नवीन वर्षात घर महागले

रेडिरेकनरचे नवे दर : शहर १४ टक्के, ग्रामीण १८ टक्के वाढ
भंडारा : दरवर्षीप्रमाणे यंदाही जमिनीच्या शासकीय दरात वाढ झाली आहे. नवीन वर्षात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार महागले आहेत. शहरात ही वाढ १२ ते १४ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १८ ते २० टक्के इतकी आहे. ६० टक्के भाग या दरवाढीपासून बचावला आहे. नागपूर विभागात सर्वाधिक दर भंडारा जिल्ह्याचे वाढले आहेत.
दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेडिरेकनरचे नवीन दर लागू केले जातात. दरवर्षी त्यात वाढ होत असते. यंदाही मात्र दर जास्त पटीने वाढलेले आहे. बँका गृहकर्ज देताना आणि खरेदी विक्रीचे व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटीसाठी जमिनीचे शासकीय दर हेच आधार मानतात. त्यामुळे रेडिरेकनरच्या दराचा थेट परिणाम बाजारभावावर होतो.
राज्याचा नगर रचना विभाग ३१ डिसेंबरला रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर करतो. त्यानुसार यंदा शहरातील वस्तीमधील जमिनीच्या दरात तुलनेने अधिक वाढ झाली आहे. बेला व भिलेवाडा यासारख्या भागातही जमिनीचे दर वाढले आहेत. भंडारा शहरातील अनेक वस्त्यांमधील जमिनीचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. जिल्ह्यातील ६० टक्के भागात मागील वर्षीचेच दर कायम ठेवण्यात आले आहे. परंतु शहरातील दर अधिक पटीने वाढले आहे.
संकेतस्थळाचा अनेकांना फटका
दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून रेडिरेकनरचे वाढीव दर लागू केले जातात. यामुळे स्टॅप ड्युटी जास्त द्यावी लागते. त्यामुळे पैसे वाचविण्यासाठी लोक ३१ डिसेंबरपूर्वी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करतात. यंदाही असेच चित्र होते. २८ तारखेपासूनच लोक मोठ्या संख्येने खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचले. परंतु आॅनलाईन नोंदणी स्वीकारणारे संकेतस्थळ ठप्प झाले होते. त्यामुळे अनेकांना आल्यापावली परतावे लागले होते. काहींनी आधी नोंदणी केल्यामुळे स्टॅम्प ड्युटीच्या पैशांची बचत झाली. आता वाढीव दराने खरेदी विक्रीचे व्यवहार करावे लागणार असल्यामुळे सरासरी १५ ते २० टक्के रकमेचा अतिरिक्त फटका बसणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Home Expenses In New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.