सेंदुरवाफा येथे दाेन लाखांची घरफाेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:46+5:302021-04-07T04:36:46+5:30

साकाेली : लगतच्या सेंदुरवाफा येथील बंद घराचे कुलूप ताेडून चाेरट्याने दाेन लाख रुपयांचे साेन्या-चांदीचे दागीने लंपास केल्याची घटना साेमवारी ...

Home burglary of Rs | सेंदुरवाफा येथे दाेन लाखांची घरफाेडी

सेंदुरवाफा येथे दाेन लाखांची घरफाेडी

साकाेली : लगतच्या सेंदुरवाफा येथील बंद घराचे कुलूप ताेडून चाेरट्याने दाेन लाख रुपयांचे साेन्या-चांदीचे दागीने लंपास केल्याची घटना साेमवारी सायंकाळी उघडकीस आली. भरदुपारी झालेल्या या चाेरीने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चांगुना विठ्ठल पडाेळे (रा. प्रगती काॅलनी, सेंदुरवाफा) या साेमवारी सकाळी ९ वाजता लाखनी येथे गेल्या हाेत्या. मुलगा निशांत याने घराला कुलूप लावले हाेते. सायंकाळी ४ वाजता त्यांची मुलगी प्रिया घरी आली तेव्हा कुलूप तोडलेले दिसून आले. अलमारीतून चाेरट्यांनी साेन्याची चेन, अंगठ्या, नथ, टाॅप्स, गरसाेळी, चांदीचे शिक्के, पायपट्या, छल्ला आणि नगदी पाच हजार रुपये असा मुद्देमाल चाेरुन नेल्याचे दिसून आले. यावरून साकाेली पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात चाेरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पीएसआय सूर्यवंशी करीत आहे.

Web Title: Home burglary of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.