शॉट सर्किटमुळे घर बेचिराख
By Admin | Updated: May 26, 2017 02:03 IST2017-05-26T02:03:11+5:302017-05-26T02:03:11+5:30
शहरातील शहर वॉर्ड, लिकनगर येथील गजबजलेल्या लोकवस्तीत मध्यरात्री शॉट सर्किटमुळे आग लागल्याने घर बेचिराख झाल्याची घटना

शॉट सर्किटमुळे घर बेचिराख
लाखो रूपयांचे नुकसान : नेरकर कुटुंबीयावर बेघर होण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरातील शहर वॉर्ड, लिकनगर येथील गजबजलेल्या लोकवस्तीत मध्यरात्री शॉट सर्किटमुळे आग लागल्याने घर बेचिराख झाल्याची घटना २४ मे ला मध्यरात्री १ वाजता घडली. आगीचा भडका इतका भयंकर होता की अंगावरच्या कपड्याशिवाय घरातून कोणतेही सामान काढता येवू न शकल्याने त्या घरातील सदस्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे.
तिलकनगर येथे ईस्तारू गणू नेरकर यांचे कौलारू घर आहे.मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा भडका उडाला. यादरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता पालिकेच्या अग्नीशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत काहीच उरले नाही. तहसिलदार व त्यांच्या चमुने घटनास्थळाचा पंचनामा करून आर्थिक साह्याकरिता प्रकरण पाठविल्याची माहिती आहे.
नगराध्यक्षांतर्फे नेरकर कुटुंबीयांना आर्थिक मदत
नेरकर कुटूंबियांची आधिचीच आर्थिक परिस्थिती बेताची असताना घराला लागलेल्या आगीमुळे त्यांचे संपूर्ण घर सामानासह जळाल्याने नेरकर कुटूंबियावर मोठा आघात ओढावला असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी नगरसेवक मेहताब ठाकूर, कैलास पडोळेसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरील स्थिती अवलोकन करून तहसिलदारांना घटनास्थळाचे पंचनामा करून मुख्यमंत्री आपदा निधीचा लाभ मिळण्याकरिता प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले. नेरकर कुटुंबियावर ओढावला आघात पाहता प्रदीप पडोळे यांनी स्वत: ५० हजार रूपयाचे आर्थिक सहकार्य करून मदतीचा हात पुढे केला. विविध सामाजिक संघटनांनीहीनेरकर कुटूंबियांना सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.