संविधान न्याय देणारा पवित्र ग्रंथ -राणा
By Admin | Updated: December 30, 2016 01:54 IST2016-12-30T01:54:13+5:302016-12-30T01:54:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य विशाल आहे. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची व बुद्धीमत्तेची

संविधान न्याय देणारा पवित्र ग्रंथ -राणा
जवाहरनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य विशाल आहे. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची व बुद्धीमत्तेची छाप सोडली आहे. डॉ. आंबेडकरांसारखे संघर्षशिल बाण्याचे व्यक्तीमत्त्व कमविले पाहिजे आणि समाजाच्या उत्थानासाठी न्यायी भावनेने झटले पाहिजे. त्यांनी लिहिलेले संविधान हे सर्वांना समान न्याय देणारे पवित्र ग्रंथ आहे, ही डॉ. आंबेडकरांच्या विचारांची फार मोठी देणगी आहे असे प्रतिपादन डॉ. अशोक राणा यांनी केले.
तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय, पेट्रोलपंप (जवाहरनगर) येथील युजीसी दिल्ली द्वारा पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राद्वारे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार’ या विषयावर व्याख्यानमालेत बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव डॉ. जी.डी. टेंभरे, डॉ. अशोक राणा, योगेश राणा, प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंसी, कार्यक्रम समन्वयक प्रा. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. (वार्ताहर)