प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:27+5:30

वीज कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असताना वीज वितरण कंपनीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असून संघटना नेहमीच पाठपुरावा करीत होती. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होवू शकल्या नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.

Holding of staff for pending demands | प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे

Next
ठळक मुद्देपाठपुरावा करूनही न्याय नाही : कर्मचाऱ्यांचा दशकापासून संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर वीज कर्मचाºयांनी बुधवारपासून आंदोलनाचा मार्ग पत्करला. भंडारा येथील वीज वितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला आहे. प्रथम दिवशी तीन कर्मचाऱ्यांनी धरणे दिली.
वीज कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असताना वीज वितरण कंपनीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे भंडारा विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित असून संघटना नेहमीच पाठपुरावा करीत होती. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होवू शकल्या नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.
बुधवारी आंदोलनाला केंद्रीय पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. यात कामगार महासंघाचे केंद्रीय पदाधिकारी बोक्षे, मगरे, झोनल सचिव सुशील शिंदे, प्रविभागीय सचिव आर.एम. बडवाईक, साकोली विभागाचे अध्यक्ष गजानन काटेखाये आदी उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याशी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मुद्यांवर चर्चा केली. प्रशासनाने कामगार महासंघाची भूमिका लक्षात घेवून समाधानकारक चर्चा केली.
तसेच समस्या निकाली काढण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचे ठरविण्यात आल्याचेही महासंघाने ठरविले आहे. प्रथम दिवशी धरणे आंदोलनाचे नंतर रूपांतर साखळी आंदोलनात करण्यात आले आहे. आजच्या आंदोलनात वी.के. खलोदे, सुनील बांगरे, व्ही.ए. गभने यासह कामगार महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या पदाधिकाºयांनी समस्या निकाली निघेपर्यंत आंदोलनाच्या भुमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

Web Title: Holding of staff for pending demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज