शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

भंडारा जिल्हा परिषदेसमोर मुख्याध्यापक संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना सुधारण्याची संधी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेकडे मागितली होती. तथापि, अधीक्षक यांच्या वर्तनात व कारभारात किंचितही फरक पडला नाही. जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर संघटनांनी अधीक्षकांना आधी निलंबित करा व नंतर चौकशी करा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांच्या समितीने चौकशी केली. चौकशी होऊन तीन आठवडे सरले. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अपमानित करणे व कार्यालयात मटण पार्टी करून शिस्तभंग करणाऱ्या वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक  (माध्यमिक) अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांना निलंबित करा, या मागणीसाठी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना सुधारण्याची संधी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेकडे मागितली होती. तथापि, अधीक्षक यांच्या वर्तनात व कारभारात किंचितही फरक पडला नाही. जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर संघटनांनी अधीक्षकांना आधी निलंबित करा व नंतर चौकशी करा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांच्या समितीने चौकशी केली. चौकशी होऊन तीन आठवडे सरले. अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वेतन पथकात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाणउतारा करणे, वैद्यकीय वेतन पारित करण्यासाठी व विविध बिले काढून देण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण करणे हे नित्याचे झाल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. तसेच जाणीवपूर्वक नियमित वेतन देयके उशिरा करणे आदी बाबींमुळे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांना अपमानित करणे व कार्यालयात मटण पार्टी करून शिस्तभंग करणाऱ्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, ऑक्टोबर महिन्याचे वेतन देयक दिवाळीपूर्वी पारित करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने  दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत धरणे देण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना निवेदन सादर करण्यात आले. धरणे आंदोलनात विदर्भ  मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यात जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रेखा भेंडारकर, सचिव राजू बांते, प्रमोद धार्मिक, अर्चना बावणे, शिक्षक परिषदेचे अंगेश बेहलपाडे, सुनीता तोडकर, राधेश्याम धोटे, सुधाकर कहालकर, सुनील घोल्लर, खोब्रागडे, अनमोल देशंपाडे, एस.डी. आरीकर, कोहपरे, राजू बारई, हिवराज उके, राजू भोयर आदींची भाषणे झाली. या वेळी विष्णू शेंडे, विलास जगनाडे, विपीन रायपूरकर, अनमोल देशपांडे, अमोल हलमारे, सुनील घोल्लर, हरीराम लांजेवार, सुनील गांगरेड्डीवार, राजू बारई, रामकृष्ण शेंडे, सेवक मने, शालीक चेटुले, गीता बोरकर, जी.एन. टिचकुले, चिंतामण यावलकर आदी १७० मुख्याध्यापक धरणे आंदोलनाला उपस्थित  होते.

ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीऑक्टोबरचे वेतन २५ ऑक्टोबर रोजी बीडीएस निघाल्यानंतर लगेच  कोषागार कार्यालयात घातले जातील, असे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी मुख्याध्यापक संघाला सांगितले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक