ग्रामसेवकांनी दिले पंचायत समितीसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:54 IST2019-08-10T00:53:26+5:302019-08-10T00:54:14+5:30
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती समोर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

ग्रामसेवकांनी दिले पंचायत समितीसमोर धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती समोर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
भंडारा पंचायत समितीसमोर शुक्रवारी ग्रामसेवकानी धरणे दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य संघटक विलास खोब्रागडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप फुंडे, सचिव प्रदीप लांजेवार, जयंत गडपायले, घनश्याम लांजेवार, विजय गोरडवार, श्याम बिलवणे यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते.
तुमसर पंचायत समितीसमोर नरेंद्र सोंदाळकर, तारासिंग राठोड, अश्विन डोहळे, नशिम शेख यांच्या नेतृत्वात तर लाखांदूरमध्ये मनोज वरूडकर, अनिल शहारे, देवानंद कापगते, अनिल धमगाये यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. मोहाडी येथे आंदोलनात निरंजना खंडाळकर, सतीष गिते, मिनाक्षी फटकाळ, संध्या उद्धव भुरे. साकोली येथे तुळशीदास कोरे, प्रभाकर रामटेके, घनश्याम मडावी. पवनी येथे शैलेश खोब्रागडे, महेंद्र हेमणे, विश्वजीत उके, हरीष टेंभूर्णे आंदोलना सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
लाखनीत आंदोलन
ग्रामसेवक संघटनेच्यावतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून येथील पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले. यावेळी तालुका शाखा अध्यक्ष मंगला डहारे, अमित चुटे, माणिक शेंडे यांनी नेतृत्व केले. आंदोलनात डी.एम. बावनकुळे, अजय राऊत, प्रतीभा बोरकर, रवी टोपरे, सुधाकर गायधने, मंगला साखरकर, मुनेश्वरी चकोले, भुदेव बेंदरे, एस.पी. तरजुळे, रत्नमाला बावनकुळे आदी सहभागी झाले.