विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:14 IST2019-02-02T23:13:50+5:302019-02-02T23:14:02+5:30
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मागण्याच्या पुर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले.

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मागण्याच्या पुर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले.
नेतृत्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे व जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विजय देवगिरकर, भाऊराव वंजारी, विलास खोब्रागडे, दारासिंग चहाण, अनंत जायभाये, मेघराज अंबादे, भारत राठोड, धिरज बांते, सचिन ठवरे विनोदकुमार मेश्राम, धनविर कानेकर, शालीकराम खोब्रागडे डी. पी. मेश्राम, टेकचंद मारबते, एम एस बगमारे, पंजाब राठोड आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांनी आपल्या मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. या आंदोनलनात जिल्ह्यातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.