ओबीसी महासंघाचे जिल्हा कचेरीसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST2021-09-25T04:38:02+5:302021-09-25T04:38:02+5:30

ओबीसीच्या रास्त मागण्या आणि ओबीसीचे धोक्यात आलेले राजकीय आरक्षण कायम व्हावे, सर्व ओबीसीच्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे. ओबीसीच्या ...

To hold in front of OBC Federation District Office | ओबीसी महासंघाचे जिल्हा कचेरीसमोर धरणे

ओबीसी महासंघाचे जिल्हा कचेरीसमोर धरणे

ओबीसीच्या रास्त मागण्या आणि ओबीसीचे धोक्यात आलेले राजकीय आरक्षण कायम व्हावे, सर्व ओबीसीच्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे. ओबीसीच्या संविधानिक अधिकाराप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन यांच्याकडे प्रतिनिधी मंडळाद्वारे ओबीसीचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी, भंडारा जिल्हा राष्ट्रीय ओबीसीचे अध्यक्ष डॉ. मुकेश पुडके, महिला जिल्हा शोभना गौरशेट्टीवार, युवक जिल्हाध्यक्ष चिराग काटेखाये यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. तेव्हा प्रामुख्याने ओबीसीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धरणेत सरिता मदणकर, नूतन खंडाळे, मंजुषा बुरडे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, राजेंद्र पेटकर, रेणुका पेटकर, सुरेश बुरडे, राजहंस अतकारी, विलास केजकर, ज्ञानेंद्र आगासे, विनोद बाबरे, सतीश सार्वे, प्रेमसागर गणवीर, अद्यान राघवते, उत्तम कळपाते, महेश पंचभाई, राहील गिऱ्हेपुंजे, रोशन उरपुडे, नरेश डाहारे, संजय रेहपाडे, अंशुल डहारे, परमेश बलके, यशवंत भोयर, जे.डी. खाऊटकर, विनोद वट्टी, हिरकन डाहरे, भद्दू कायले, प्रभाकर सपाटे, राधेश्याम खोब्रागडे, उमेश कटाने, सदानंद इमले, के.झेड. शेंडे, मुरलीधर भर्रे, सुरेश ठवकर, रोशन जांगळे, दीपक गजभिये आदी सहभागी झाले होते.

Web Title: To hold in front of OBC Federation District Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.