सिहोरा परिसरात बंधाऱ्यांना भगदाड!
By Admin | Updated: May 9, 2014 01:43 IST2014-05-08T23:36:14+5:302014-05-09T01:43:53+5:30
केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम तथा योजना राबवित आहे.

सिहोरा परिसरात बंधाऱ्यांना भगदाड!
रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)
केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम तथा योजना राबवित आहे. परंतु या कोट्यवधी खर्चाच्या योजना नियोजनशून्य असल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात सिहोरा परिसरात दिसून आलेला आहे. बंधारे आता निरुपयोगी असल्याचे निदर्शनास आली आहे. सिहोरा परिसरात नागरिक,शेतकरी तथा वीज ग्राहकांना सुविधा, न्याय देण्यासाठी लोकमतने विशेष अंतर्गत सदरात वृत्तमालिका मांडली आहे.बपेरा आंतर राज्य सीमा, वन विभाग, पाटबंधारे विभाग आणि विज वितरण कंपनी या विभाग अंतर्गत नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, या आशयाची कैफीयत मांडण्यात आली आहे. या वृत्तांना नागरिकांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य शासन शेतकर्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम राबवित आहे. स्वतंत्र कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग, हरीयाली योजना असे अनेक विभाग कार्य करीत आहेत. शेतकर्यांच्या हितार्थ या विभाग अंतर्गत योजना क्रीयान्वीत करण्यात येत आहेत. सिहोरा परिसरात अशा ८ गावात ही शोधमोहीम राबविण्यात आली आहे. शेतशिवारात नाले आहेत. या नाल्यात पाणी अडविण्यासाठी बंधारे मंजूर करण्यात आली आहे. बंधारे पाणी अडवीत असल्याने जमिनीची धूप कमी होते. अडचणीत शेती सिंचीत करताना याच बंधार्याचा उपयोग शेतकरी पाण्याचा उपसा करण्यासाठी करीत आहेत. परंतु प्रत्यक्षात बंधारे असतानाही पाणीच नाही. असे चित्र दिसून आली आहेत. काही बंधार्यांचे बांधकाम नियोजनशून्य झाली आहेत. अनेक बंधारे जिर्ण झाली आहे. या नादुरुस्त बंधार्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सरासरी बंधारे बांधकामात लक्षावधी खर्च करण्यात आली असून उपयोगमात्र शून्य आहे. लघु पाटबंधारे विभागाचे बंधारे पाणी अडवित आहेत. काही बंधार्यांना लहान झरणे आहेत. हरियाली योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेली बंधारे कोरडीच आहेत. बंधारे बांधकाम योग्यरितीने झाली असली तरी नियोजनशून्य आहेत. शासनाच्या निधीचा उपयोग झालेला नाही.
सर्वाधिक ढिसाळ बंधार्याचे बांधकाम कृषी विभाग मार्फत करण्यात आली आहे. बंधारे बांधकामाचा कालावधी जुना आहे. परंतु या बंधार्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे शेतकर्यांना कृषी विभाग किती गंभीर आहे हे यावरुन दिसून येत आहे. सिंदपुरी गावाच्या हद्दीत दोन बंधारे आहेत. एका बंधार्याला लोखंडी पत्रे नाही. लोखंडी पत्रे लावण्याचा नियोजन नाही. यामुळे याबंधार्यात पाणीच अडत नाही. दुसर्या बंधार्याला भगदाड पडली आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गलगत हा बंधारा आहे. याच बंधारालगत सिहोरा गावाला पाणीपुरवठा करणारी नळयोजना आहे. परंतु बंधार्याला भगदाड असल्याने पाणी अडत नाही. बंधार्यात पाणी अडल्यास नळयोजनेला पाणी पुरवठा करणार्या विहिरीची पातळी वाढणार आहे. प्रत्यक्षात तसे प्रयत्न होत नाही.
गोंडीटोला, बिनाखी गावाच्या शेतशिवारात कृषी विभागाचे बंधारे असले तरी नाममात्रच आहेत. ज्या विभागावर शेतकर्यांची विकास साधण्याची जबाबदारी आहे, अशा विभागाचे योजना दीर्घकाळ टिकणार्या नाही. हरदोली गावात मंडळ कृषी कार्यालय आहे. सिहोराच्या हक्काचा कार्यालय अन्य गावातून प्रशासकीय कारभार करीत आहे. १० बाय १० च्या जिर्ण खोलीतून ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करताना यंत्रणेला नाकीनऊ येत आहे. पावसाळयात खोलीत बसणे मुश्किल होत आहे. या विभागाच्या योजना कळायला मार्ग नाही. जिल्हा परिषदेचा कृषी विभागमार्फत पंचायत समिती स्तरावरुन बैलबंडी, विहिरी, ताडपत्रीच वाटप करीत आहे. नवीन तंत्रज्ञान निर्मित असे साधणे नाहीत. अनेक योजना तर परस्पर वाटप करण्यात येत आहेत.