शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

परसोडीच्या ऐतिहासिक पोळ्याला १६१ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:57 IST

संपूर्ण राज्यात बैल पोळा साजरा केला जातो. भंडारा तालुक्यातील परसोडी (जवाहरनगर) येथे भरणाऱ्या पोळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १८५८ पासून दरवर्षी येथे पोळा भरविला जातो. संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेला हा पोळा सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी होत असतात.

ठळक मुद्दे१८५८ ला प्रारंभ : पिढ्यानपिढ्या जोपासला जातो सर्वधर्म समभाव, पोळ्याच्या दिवशी पंचक्रोशीतील नागरिकांची हजेरी

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : श्रमाचा सन्मान करण्याचा सण म्हणजे पोळा. वर्षभर बळीराजासाठी राबराब राबणाऱ्या बैलांच्या सन्मानाचा दिवस. संपूर्ण राज्यात बैल पोळा साजरा केला जातो. भंडारा तालुक्यातील परसोडी (जवाहरनगर) येथे भरणाऱ्या पोळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १८५८ पासून दरवर्षी येथे पोळा भरविला जातो. संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेला हा पोळा सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी होत असतात.परसोडी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. पुर्वी येथे वंजारी, गुप्ते, हटवार, डोरले, पडोळे, सुखदेवे, मेश्राम, राऊत, चव्हाण, मोटघरे आदी परिवार राहत होते. गजानन महाजन यांची सावरी, ठाणा नांदोरा येथे वतनदारी होती. गुप्ते पाटलांची वतनदारी परसोडी,बाचेवाडी, सिरसोली, किन्ही, एकोडी येथे होती. आजही परसोडी येथे महाजन व गुप्ते यांचा वाडा अस्तित्वात आहे. या वाड्यासंमोर बैलांचा पोळा भरविला जात होता. या पोळ्याला प्रारंभ १८५८ मध्ये झाल्याचे जुने जाणते सांगतात. तेव्हापासून आजतागायत पोळ्याची परंपरा कायम असून काळ बदलला तरी बैल पोळ्याचे महत्व मात्र कायम आहे.पुर्वी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांद शेकले जातात. त्याला मोहबैली असे म्हटले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करुन सायंकाळी ५ वाजता गुप्ते पाटलांचा बारा व गजानन महाराज यांच्या १५ बैलजोड्या आंब्याच्या तोरणाखाली एकत्र येत असत. पारंपारिक झडत्या म्हटल्या जात असे. दिवंगत दपटू डोरले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष मारोतराव हटवार यांचे वडील व गावचे प्रथम सरपंच भीवा हटवार यांनी पोळ्याची परंपरा टिकवून ठेवली.आजघडीला परसोडीची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. १९८० पासून बैलांच्या सजावटीसाठी बक्षीस देण्यास प्रारंभ झाला त्यामुळे या पोळ्याला महत्त्व आले. सर्वत्र बैलजौड्यांची संख्या कमी झाली असतांनाही परसोडीच्या पोळ्यात दीडशे ते दोनशे बैलजोड्या सहभागी होतात. हा पोळा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून नागरिक येतात. गावात तीन दिवस यात्रेचे स्वरुप असते. महिला व पुरुष महाराष्टीयन पोषाखात वावरताना दिसतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचे आमदंगल असते. यासोबतच कबड्डी, चमचा गोळी, बांधा दौड, बटाटा आदी स्पर्धा घेतल्या जातात. पंचक्रोशीतील नागरिकांची हजेरी असते.

टॅग्स :Farmerशेतकरी