रस्ता खडीकरणासाठी आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: September 22, 2014 23:14 IST2014-09-22T23:14:45+5:302014-09-22T23:14:45+5:30
सालई (खुर्द) नेरला आंधळगाव या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सालई खुर्द ग्रामवासीयांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

रस्ता खडीकरणासाठी आंदोलनाचा इशारा
उसर्रा : सालई (खुर्द) नेरला आंधळगाव या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सालई खुर्द ग्रामवासीयांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सालई खुर्द नेरला आंधळगाव या रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी निधी मंजूर होऊन सुद्धा जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने काम सुरु करण्यात आले नाही. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची उदासीनता ही कारणीभूत असल्याचे चित्र दिसत आहे. मोहाडी तालुक्यांतर्गत येत असलेल्या सदर रस्ता थेट आंधळगाव बाजारपेठेत दैनंदिन जीवनासाठी व उपभोगाच्या साहित्यासाठी जसे बाजार, किराणा, कपडे यासाठी नागरिकांना आंधळगाव येथे जावे लागते. सदर रस्ता पावसाळ्यात अत्यंत चिखलमय असतो तसेच रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून अपघाताला केव्हाही आमंत्रण दिले जाऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाला कित्येकदा कळविले. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासकीय उदासीनतेमुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नितीन लिल्हारे, प्यारेलाल दमाहे, प्रवीण लिल्हारे, संदीप पटले, ईश्वर पटले, पंकज दमाहे, पृथ्वीराज दमाहे, किशोर मसरके, सुनिल नागपुरे, चेतन खांडेकर, दिपक बन्सोड, जितेंद्र लिल्हारे आदींनी केली आहे. (वार्ताहर)