भंडाऱ्यात हिंदू संमेलन १७ जानेवारीला
By Admin | Updated: January 12, 2015 22:45 IST2015-01-12T22:45:19+5:302015-01-12T22:45:19+5:30
हिंदू म्हणजे एक वैभवशाली संस्कृती व उत्तम आयुष्य जगण्याची जीवनपद्धती होय. अशा या संस्कृतीचे व जीवन पद्धतीचे नव्या पिढीला महत्त्व कळावे, हिंदू जीवनमुल्यांची पुर्नस्थापना व्हावी

भंडाऱ्यात हिंदू संमेलन १७ जानेवारीला
भंडारा : हिंदू म्हणजे एक वैभवशाली संस्कृती व उत्तम आयुष्य जगण्याची जीवनपद्धती होय. अशा या संस्कृतीचे व जीवन पद्धतीचे नव्या पिढीला महत्त्व कळावे, हिंदू जीवनमुल्यांची पुर्नस्थापना व्हावी व त्यातून एक जागृत शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी भंडारा शहरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
शनिवार, दि१७ जानेवारीला दुपारी १ वाजता स्थानिक लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या संमेलनासाठी रामबालकदासजी महाराज (छत्तीसगड), महिला सुरक्षा व धर्मातरणाविरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या दुर्गा सरेआम व नाशिक येथील जैविक शेती तज्ज्ञ अण्णाजी हांडे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या संमेलनात सर्व जाती धर्म, संप्रदायाचे संत महात्म्यांची उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनाला शेती व इतर धार्मिक ग्रंथ, पुस्तके व इतर साहित्य विक्रीकरीता स्टॉल लावण्यात येणार आहे. तत्पूर्वी या संमेलनाची जनजागृती करण्यासाठी दि.१४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गणेश विद्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला आयोजन समितीचे अध्यक्ष उद्धव डोरले, उपाध्यक्ष बंडू बारापात्रे, रामविलास सारडा, सुनिल मेंढे, सुभाष आजबले उपस्थित होते.
(जिल्हा प्रतिनिधी)