अपहरण करून इसमाला बेदम मारहाण
By Admin | Updated: February 9, 2015 23:07 IST2015-02-09T23:07:48+5:302015-02-09T23:07:48+5:30
नोकरी लावून देतो म्हणून काही रक्कम इसमाने घेतली. ती रक्कम परत करीत नाही म्हणून संतप्त पाच युवकांनी त्याला घरासमोर बदडले. नंतर चारचाकी वाहनात उचलून सोबत नेले.

अपहरण करून इसमाला बेदम मारहाण
तुमसर : नोकरी लावून देतो म्हणून काही रक्कम इसमाने घेतली. ती रक्कम परत करीत नाही म्हणून संतप्त पाच युवकांनी त्याला घरासमोर बदडले. नंतर चारचाकी वाहनात उचलून सोबत नेले. वाटेत त्याला पुन्हा बेदम मारहाण केली. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्याला रात्री गोंदिया रेल्वेस्थानकावर सोडून दिले. या प्रकरणातील पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ओमकार माहूले (४०) रा.देव्हाडी असे या इसमाचे नाव आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास पाच युवक ओमकारचा शोध घेत घरी आले. कळायच्या आतच ओमकारला बदडले व चारचाकी वाहनात सोबत गोंदियाकडे घेवून गेले. वाटेत ओमकारला बेदम मारहान केली. रात्री ११ च्या सुमारास प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकावर सोडले. ओमकारने तुमसर पोलिसात तक्रार केली. पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी पाच युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ओमकार काही वर्षापुर्वी सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करीत होता. दरम्यान मोबाईल टॉवर ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून अनेकाकडून त्याने पैसे घेतले. त्यांनी ओमकारला पैसे परत करण्याची गळ घालून संपर्क साधला असता त्याने टाळले तथा पळ काढायचा दरम्यान रविवारी ओमकार घरी असल्याची माहिती त्या युवकांना मिळाली. रात्री ८ च्या सुमारास त्यांनी ओमकारला घरीच गाठले. पाच सराईत नाहीत त्यांनी अपहरण केल्यावर ते घाबरले व नंतर त्यांनी ओमकारला रेल्वेस्थानकावर सोडले. चूक केली म्हणून त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी )