महामार्गाचे बांधकाम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:27 IST2019-03-25T22:27:04+5:302019-03-25T22:27:21+5:30
मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होवून तीन महिन्यांचा कार्यकाळ लोटला तरी रस्ता रूंदीकरणात भरावाची कामे अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. सदर रस्त्यांची संथगतीने सुरू असून मुरूम व रेतीची कमतरता हे एक प्रमुख कारण असल्याचे समजते. मुरूमाची लीज न मिळणे व रेती घाटांचा लिलावांचा फटका राष्ट्रीय महामार्गचा कामांना बसला आहे.

महामार्गाचे बांधकाम संथगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होवून तीन महिन्यांचा कार्यकाळ लोटला तरी रस्ता रूंदीकरणात भरावाची कामे अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. सदर रस्त्यांची
संथगतीने सुरू असून मुरूम व रेतीची कमतरता हे एक प्रमुख कारण असल्याचे समजते. मुरूमाची लीज न मिळणे व रेती घाटांचा लिलावांचा फटका राष्ट्रीय महामार्गचा कामांना बसला आहे.
तीन ते चार महिन्यापुर्वी धडाक्यात मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत कामे जोरात करण्यात आली, परंतु भंडारा जिल्ह्याची सीमा सुरू होताच कामांची गती संथगतीने सुरू झाली. मागील तीन महिन्यात कासवगतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. केवळ रस्त्यावरील लहान मोठे पूलांचे काम येथे नियमित सुरू आहे. दुपदरीकरण हा रस्ता असून रस्त्याच्या दोन्ही बाजुला रूंदीकरण करण्यात आले आहे. रूंदीकरणातील खड्यात मुरूमांचा भरावयाची तरतुद आहे. त्यामुळे हजारो ब्रास मुरूमाची गरज आहे. मोहाडी तालुक्यात मुरूम खनन प्रकरणात कारवाईची नोटीस संबंधितांना देण्या आली होती.
तुमसर तालुक्याच्या सीमेत हजारो ब्रास मुरूमाची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरूमाची लीज प्राप्त झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे कामे सध्या रखडली आहेत. सिमेंट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. रेतीघाट लिलाव नसल्याने कंत्राटदाराला मध्यप्रदेशातून रेती खरेदी करणे परवडत नाही. माडगी दे. शिवारात सुमारे २०० ते ३०० मीटर केवळ सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. त्यापुढील रस्ता बांधकाम बंद करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने सिमेंट रस्ता बांधकामाला पाण्याची मोठी गरज आहे. पाणी उपलब्ध करणे ही मोठी समस्या आहे. पुन्हा काही काळ रस्ता बांधकाम रखडण्याची शक्यता येथे वर्तविण्यात येत आहे.
मुरूम व रेतीची चौकशी होणार
तुमसर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वापरण्यात आलेले मुरूम व रेती यासंदर्भात चौकशी होणार असल्याची माहिती आहे. मुरूम व रेतीची किती वापर करावा याचा तपशील निविदेत नमूद आहे. त्यानुसार वापरण्यात आलेला एकूण मुरूम व रेती यांची टीपी यांचा ताळमेळ बसणे गरजेचे आहे. त्यानुसारच कंत्राटदाराला नियमानुसार बिल प्राप्त होते. नियमबाह्य मुरूम व रेती वापरली गेली असेल तर महसूल अधिनियमानुसार मोठी दंडाची रक्कम वसुल करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाला मुरूम उपलब्ध व्हावे याकरिता तलाव, खोलीकरण, बुजलेले तलाव पुनरूज्जीवन करणे इत्यादींचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. लाखो ब्रास मुरूम उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने नवीन शक्कल लढविल्याची माहिती आहे.