नागझीरा-नवेगावबांध येथे ‘हाय अलर्ट’
By Admin | Updated: July 25, 2016 00:36 IST2016-07-25T00:36:39+5:302016-07-25T00:36:39+5:30
भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या उमरेड कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या व जुने माहेरघर असलेल्या ..

नागझीरा-नवेगावबांध येथे ‘हाय अलर्ट’
प्रकरण ‘जय’ची शोधमोहीम : वन कर्मचाऱ्यांची दमछाक
संजय साठवणे साकोली
भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या उमरेड कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या व जुने माहेरघर असलेल्या नागझीरा अभयारण्यातील जय नामक वाघाच्या शोधार्थ नागझीरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात आठ दिवस हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी डोळ्यात तेल घालुन जय चा शोध घेत आहेत.
नागझीरा अभयारण्यात जन्माला आलेल्या जय हा वाघ काही वर्षापुर्वी उमरेड कऱ्हांडला या राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पात निघुन गेला. लहानपणापासुनच पर्यटकांना आवडणारा देखना वाघ हा सर्वाच्याच आवडीचा होता. पुर्वी नागझीरा अभयारण्यात व नंतर उमरेड कऱ्हांडला व्याघ्रप्रकल्पात सर्वांना हवाहवासा वाटणारा हा जय वाघ मागील काही महिन्यापासून बेपत्ता आहे.
जय बेपत्ता झाल्यापासून वनविभागाचे अधिकारी त्याला शोधण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहेत. मात्र जय चा अजुनपर्यंत थांगपत्ता लागला नाही. ऐवढेच नाही तर जय च्या गळ्यातील रेडीओ कॉलरही निष्क्रीय झाल्याचे वनविभागाची चिंता वाढली आहे.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील जंगले एकमेकांना लागुन असल्याने जयचा शोध घेणे अडचणीचे झाले आहे. मात्र जयचे माहेरघर हे नागझीरा अभयारण्य असल्याने तो नागझीरा अभयारण्यात तर आला नसावा अशी शंका बळावली.
त्यामुळे इकडेही जयची शोधाशोध सुरु झाली आहे. यासाठी नागझीरा नवेगाव हा व्याघ्रप्रकल्प दोन दिवसांपासून हाय अलर्ट करण्यात आले असुन नवीन नागझीरा, जुना नागझीरा, नवेगावबांध, कोका जंगल परिसर पुर्णपणे पिंजून काढण्यात येत आहे. मात्र अजुनपर्यंत जय चा शोध लागला नाही.
जय च्यामाहेरघर हे नागझीरा अश्रयास्थ असल्यामुळे कदाचित जय हा नागझीरा अभयारण्यात आला तर नाही यासाठी नागझीरा व नवेगावबांध येथे हाय अलर्ट करण्यात आला. जयच्या शोधात शोधमोहिम जोरात सुरु आहे.
- नरेश खंडाते,
सहाय्यक वनसंरक्षक