आता ग्रामपंचायती होणार हायटेक
By Admin | Updated: August 28, 2014 23:35 IST2014-08-28T23:35:34+5:302014-08-28T23:35:34+5:30
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण जनता मागे राहू नये, यासाठी राज्य शासनाने संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स, ई पंचायत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. यात सर्व ग्रामपंचायती

आता ग्रामपंचायती होणार हायटेक
बारव्हा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण जनता मागे राहू नये, यासाठी राज्य शासनाने संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स, ई पंचायत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. यात सर्व ग्रामपंचायती इंटरनेट सुविधेने जोडले असले तरी माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेताना ते अधिक गतीमान, पारदर्शक व लोकाभिमुख करता आले नाही.
केंद्र शासनाने नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून भारत ब्रॉडबँ्रड नेटवर्कने जोडला आहे. या अंतर्गत देशातील लाखो ग्रामपंचायती हायटेक होणार असून स्वतंत्रपणे काम करणारी ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
राज्य शासनाने तीन वर्षापुर्वी राज्यातील सर्व २८ हजार ग्रामपंचायती संगणीकृत करून ई-गर्व्हनन्स, ई-पंचायत यासारखे कार्यक्रम राबविणे सुरू केले. सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्याही संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे जोडण्यात आले आहेत.
सुमारे २० हजार गावात ई-बँकींगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आता केंद्र शासनाने संपूर्ण ग्रामीण भारतच ई-गर्व्हनन्स कनेक्टीव्हीटीने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतल्याने उच्च ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन योजनेद्वारे नव्या नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क प्रकल्पही अधिक गतीमान व प्रभावीपणे महाराष्ट्रातही राबविता येणार आहे.
ग्रामस्थांना विविध सेवा सुविधा, १९ प्रकारचे दाखले, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, शेतमालाचे बाजारभाव, शासनाच्या योजना हवामानाचे अंदाज कमी वेळात स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. इंटरनेटची रेंज नाही किंवा नेट कनेक्ट स्किनेक्ट होण्याची समस्या आगामी काळातील ब्रॉडबँड सिस्टीमने कायमची दूर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)