पवनी येथे अभाविपचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:51 IST2018-08-10T21:50:48+5:302018-08-10T21:51:04+5:30
पवनी ते पौना (बुज) मार्गावर सकाळपाळीत बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गावर तातडीने सकाळपाळीत बससेवा सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी येथील बस आगारासमो निदर्शने केले.

पवनी येथे अभाविपचे निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनी ते पौना (बुज) मार्गावर सकाळपाळीत बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गावर तातडीने सकाळपाळीत बससेवा सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी येथील बस आगारासमो निदर्शने केले. मागण्याविषयी आगार प्रमुखांशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले. मागणीची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निदर्शकांनी यावेळी दिला.
पवनी ते पौना (बुज) या मार्गावरील जूनोना, शिवनाळा, मांगली, ईसापूर, उमरी, पौना (खुर्द) व पौना (बुज) या गावातील दिडशे ते दोनशे विद्यार्थी दररोज नियमित सकाळपाळीत शिक्षणाकरीता प्रवास करीत असतात. पवनी ते पौना (बुज) या मार्गावर सकाळपाळीत बस सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी वेळेवर महाविद्यालयात पोहचू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस सेवा सुरु करण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य वाचविण्यासाठी प्रशासनाचा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या संबंधित आंदोलनाला कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला बस आगार पवनी स्वत: जबाबदार राहिल, असे आगार प्रमुखांना शिष्टमंडळाने सांगितले.
यावेळी अभाविप भंडारा जिल्हा संयोजक योगेश बावनकर, राकेश हटवार, आकाश हटवार, गणेश देशमुख, प्रसंन्या गोस्वामी, राकेश खोब्रागडे, चंदू मेश्राम, निशांत नंदनवार, पुष्पक इनकने, आकाश मैदेनकर, प्रकाश मोहरकर व सर्व अभाविपचे कार्यकर्ते तसेच अन्य ७० विद्यार्थी उपस्थित होते.