इथे मिळतात आधुनिक शिक्षणाचे धडे

By Admin | Updated: February 13, 2016 00:22 IST2016-02-13T00:22:53+5:302016-02-13T00:22:53+5:30

ग्रामीण भागातील गावची शाळा सुंदर असावी, तेथील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, गावाचे नावलौकिक व्हावे,..

Here are the lessons of modern education | इथे मिळतात आधुनिक शिक्षणाचे धडे

इथे मिळतात आधुनिक शिक्षणाचे धडे

चिखलीचा मान : पहिली डिजीटल शाळा
विशाल रणदिवे अड्याळ
ग्रामीण भागातील गावची शाळा सुंदर असावी, तेथील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, गावाचे नावलौकिक व्हावे, यासाठी चिखली ग्रामस्थ व शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. पवनी तालुक्यातील चिखली या खेड्यामध्ये असलेल्या शाळेला पहिली डिजीटल शाळेचा मान पटकाविला आहे.
पवनी तालुक्यात जिल्हा परिषदच्या अनेक शाळा आहेत. मात्र चिखली येथील इयत्ता १ ते ४ मध्ये ४५ विद्यार्थी असणारी शाळर देखणी व आधुनिक स्वरूपाची शाळा असू शकते, यावर विश्वास बसेना. पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी आयोजित स्रेहसंमेलनामध्ये चिखली शाळेचे कौतुक केले जात आहे. शाळेतील आधुनिकता पाहायला आतापर्यंत शेकडो शिक्षकांनी चिखलीला भेट दिली आहे. चिखलीत ज्ञानरचनावादी कार्यशाळा चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख एच.जी. कांबळे, प्रमोदकुमार अणेराव होते. अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी के.डी. भुरे उपस्थित होते. प्रत्येक शिक्षकाने जर चिखलीत शाळेचा आदर्श जोपासण्याचा निश्चय केला. प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी त्या गावासारखी मदत केली तर, तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळाही डिजीटल बनु शकतात, असा आशावाद मुख्याध्यापक चांदेवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन महानंदा मेश्राम यांनी केले. आभारप्रदर्शन विजय चुधरी यांनी केले.

Web Title: Here are the lessons of modern education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.