शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाकडून हेमंत पटलेंना तिकीट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 13:38 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. ही निवडणूक भाजपासाठी सर्वार्थाने महत्त्वाची असल्याने ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे, प्रशिक्षण घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले. तर शनिवार, ५ मेपासून विधानसभानिहाय मेळावे सुरु आहेत.

या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हेसुद्धा संभाव्य उमेदवार असू शकतात. 

भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी

वर्ष २०१४पासून आतापर्यंत भाजपने बहुतांश निवडणुका जिंकल्या. त्यामागे त्यांची निवडणूक स्ट्रॅटेजी काम करीत असते. संघटन बांधणी, बुथ कमिटी, कार्यकर्त्यांचे मेळावे, प्रशिक्षण हा या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. तर्कशुद्धरीत्या निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांना यश आले आहे. या स्ट्रॅटेजीचा बिमोड कसा करायचा, याचे आव्हान कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर असणार आहे.

राष्ट्रवादी १० मे रोजी दाखल करणार नामांकनकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन्ही पक्षातील पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर १० मे रोजी राष्ट्रवादीचा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता जलाराम मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे.दि.१० मे रोजी भाजप उमेदवारही नामांकन दाखल करणार असल्यामुळे गुरूवारला दोन्ही पक्षाचे शक्तीप्रदर्शन दिसून येणार आहे.

टॅग्स :Loksabhaलोकसभा