आपादग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
By Admin | Updated: July 26, 2014 23:57 IST2014-07-26T23:57:16+5:302014-07-26T23:57:16+5:30
तुमसर तालुक्यातील सिंदपुरी गावातील मामा तलाव फुटल्यामुळे शेकडो कुटुंबावर आकस्मिक आपत्ती कोसळली. त्या आपादग्रस्त कुटूंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विहिंपसह सामाजिक संघटनांनी

आपादग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
सिंदपुरीत पाणी शिरले : संघ, विहिंपच्या पुढाकाराने दानशुरांनी केली मदत
तुमसर : तुमसर तालुक्यातील सिंदपुरी गावातील मामा तलाव फुटल्यामुळे शेकडो कुटुंबावर आकस्मिक आपत्ती कोसळली. त्या आपादग्रस्त कुटूंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विहिंपसह सामाजिक संघटनांनी अत्यावश्यक साधनसामग्री देऊन मदतीचा हात दिला. त्यांच्या या कार्याचे शहरात कौतुक होत आहे.
तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ बुधवारच्या मध्यरात्री फुटल्यामुळे सिंदपुरी गाव जलमय झाले. याची माहिती मिळताच रा.स्व. संघ व विहिंपच्या कार्यकर्त्यांनी सिंदपुरीत धाव घेतली. १०५ कुटुंब उघड्यावर आले. आपदग्रस्तांची व्यथा ऐकून जिल्हा संघचालक राम चाचेरे यांनी भंडारा येथील सामाजिक संघटनांची बैठक बोलावून सिंदपुरीच्या समस्येवर अंमलबजावणी कशी करता येईल, यावर सामाजिक कार्यकर्ता सुनिल मेंढे यांच्या घरी चर्चा घडवून आणली. या बैठकीला विहीपचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, आर्ट आॅफ लिव्हींगच्या भंडारा प्रमुख हिमांगी देशमुख, हिमाजी काबरा, दिनकर गिरडकर, बंडू धकाते, चिंतामण मेहर, शैलेश नायर, बंडू बारापात्रे, सुधीर धकाते, मनोज साकुरे, जॅकी रावलानी, प्रशांत निंबोळकर, डॉ.पलास शांडिल्य, अनिल मलहोत्रा, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपातग्रस्तांना महिनाभर पुरेल एवढे साहित्य भंडारा शहरातून एकत्र करून मदत करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारला रास्वसंघ, विहिंप, राष्ट्रसेविका समिती, हिंदू रक्षामंच, बजरंग दल, शिक्षक परिषद, हिंदू हेल्पलाईन, आर्ट आॅफ लिव्हिंग, श्री संप्रदाय, पतंजली योग समिती या संघटनांनी सिंदपुरी येथील आपातग्रस्त कुटुंबांना संघचालक राम चाचेरे यांच्या अध्यक्षतेखाली व विहिप जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, अमर मोहनानी, सुनिल मेंढे, गणेश धांडे, मिना वैद्य, मुक्ता उमाळकर, डॉ.पलाश सांडिल्य, बंडू बारापात्रे, सागर खेडकर, अनिल मेहर, शाहाणे, माधोराव रामेकर, विजय निचकवडे, सचिन कुंभलकर, सिंदपुरीच्या उपसरपंच गीता पारधी, तंटामुक्तीचे अध्यक्ष वामन बोरकर व सर्व संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत ब्लॅकेट्स, चादर, चटई व आवश्यक सामुग्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा संघचालक यांनी ही मदत शासकीय नसून शहरामधील विविध संघटना, व्यापारी, समाजसेवी यांच्या मार्फत असून बंधुत्व व अपुलकीचे नाते जपणारी आहे. तसेच आढवलेल्या संकटावर आपण सामुहिकतेने नक्कीच मात करू, असा विश्वासव्यक्त करीत दानदात्यांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)