पीडित महिलांना मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:53 IST2019-02-24T00:52:31+5:302019-02-24T00:53:18+5:30
पोलीस मुख्यालय परीसरात असलेल्या महिला सुरक्षा कक्ष भंडारा येथे भंडारा जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांचे अंतर्गत ‘लिगल एॅड क्लिनीक’ पिडीत महिलांना गरजूंना कायदेविषयक सल्ला मिळण्यासाठी मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे.

पीडित महिलांना मिळणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस मुख्यालय परीसरात असलेल्या महिला सुरक्षा कक्ष भंडारा येथे भंडारा जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांचे अंतर्गत ‘लिगल एॅड क्लिनीक’ पिडीत महिलांना गरजूंना कायदेविषयक सल्ला मिळण्यासाठी मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच महिलांना अडीअडचणी साठी विशेष समुपदेशन केंद्र महिला सुरक्षा कक्ष भंडारा व महिला हेल्पलाईन क्र. १०९१ मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण भंडारा सचिव एम. ए. कोठारी, अॅड. ठाकुर, गायधने, महिला व बालकांना सहायक कक्ष भंडारा मृणाल मुनीश्वर, स्थागुशा भंडारा पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, जनसंपर्क अधिकारी भंडारा पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे, महिला सेल भंडारा पोलीस उपनिरीक्षक प्रणती लांजेवार, महिला समुपदेशन केंद्र येथील कर्मचारी उपस्थित होते.