शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

संघर्षातून ‘मंजूताई’च्या जीवनाचा प्रवास सुकर

By admin | Updated: March 8, 2017 00:32 IST

दारिद्र्य, अज्ञानता, वारसा हक्काने वाट्याला आले. पण, नियतीने नेमून दिलेल्या कार्यासमोर झुकायचे नाही, ...

आज जागतिक महिला दिन : जिद्दीसमोर कर्तृत्व ठरले महानइंद्रपाल कटकवार भंडारादारिद्र्य, अज्ञानता, वारसा हक्काने वाट्याला आले. पण, नियतीने नेमून दिलेल्या कार्यासमोर झुकायचे नाही, तर संघर्ष करायचा. ऐन उमेदीच्या काळात पदरातील तीन अपत्यांना चांगले शिक्षण द्यावे यासाठी जिवापाड धडपडणारी तथा स्वप्नरुपी पंखांना बळ देणारी म्हणजे मंजूताई.आज ८ मार्च रोजी जगात सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना संघर्षमय जीवन जगणाऱ्या या माऊलीची ही छोटेखानी कहाणी. तुमसर तालुक्यातील सोरना येथील मूळ रहिवासी असलेल्या मंजुताई विजय डहरवाल यांचे कुटुंब जवळपास एक दशकभरापूर्वी भंडाऱ्यास वास्तव्यास आले. गरीबी जगायला बळ देत नव्हती, परंतु आपण शिकू शकलो नाही पण मुलाना चांगले शिक्षण द्यावे असा चंग बांधून मंजुतार्इंनी मिळेल ते काम करण्याची हौस बाळगली. कपड्यांची शिलाई, शेतमजुरी यापासून लग्नसमारंभातही मजूर बनून काम केले. कधीकधी उपाशीही झोपी गेले. मात्र पोटच्या गोळ्यांना उपाशी ठेवण्याचे धाडस नव्हते. काम करण्याची सतत प्रेरणा पतीकडून मिळत राहायची. मंजुतार्इंचे शिक्षण आठवीपर्यंतचे तर पती विजय यांचे शिक्षण पदवी (अर्धवट) राहिलेले. शिक्षण कमी असल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत कायमस्वरुपी प्राप्त झाले नाही. मंजुतार्इंनी अहोरात्र कष्ट करून दोन मुली व मुलाला शिक्षणाकडे वळविले. निधी नावाची मोठी मुलगी आज एमटेकचे शिक्षण घेत आहे तर जुही व मुलगा अमोल हे दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. आजघडीला मंजुताई या शरीराने थकल्या असल्या तरी कुटुंब घडविण्याच्या जिद्दीने कायम आहे. महिला ही अबला नसून सबला आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मंजूताई. घरोघरी भांडेधुणी, शेतमजुरी तथा कष्ट करणाऱ्या महिलासमक्ष मंजूताई या आदर्श ठरल्या आहेत