संघर्षातून ‘मंजूताई’च्या जीवनाचा प्रवास सुकर

By Admin | Updated: March 8, 2017 00:32 IST2017-03-08T00:32:18+5:302017-03-08T00:32:18+5:30

दारिद्र्य, अज्ञानता, वारसा हक्काने वाट्याला आले. पण, नियतीने नेमून दिलेल्या कार्यासमोर झुकायचे नाही, ...

Help ease the journey of 'Manjutiai' from struggle | संघर्षातून ‘मंजूताई’च्या जीवनाचा प्रवास सुकर

संघर्षातून ‘मंजूताई’च्या जीवनाचा प्रवास सुकर

आज जागतिक महिला दिन : जिद्दीसमोर कर्तृत्व ठरले महान
इंद्रपाल कटकवार भंडारा
दारिद्र्य, अज्ञानता, वारसा हक्काने वाट्याला आले. पण, नियतीने नेमून दिलेल्या कार्यासमोर झुकायचे नाही, तर संघर्ष करायचा. ऐन उमेदीच्या काळात पदरातील तीन अपत्यांना चांगले शिक्षण द्यावे यासाठी जिवापाड धडपडणारी तथा स्वप्नरुपी पंखांना बळ देणारी म्हणजे मंजूताई.
आज ८ मार्च रोजी जगात सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना संघर्षमय जीवन जगणाऱ्या या माऊलीची ही छोटेखानी कहाणी. तुमसर तालुक्यातील सोरना येथील मूळ रहिवासी असलेल्या मंजुताई विजय डहरवाल यांचे कुटुंब जवळपास एक दशकभरापूर्वी भंडाऱ्यास वास्तव्यास आले. गरीबी जगायला बळ देत नव्हती, परंतु आपण शिकू शकलो नाही पण मुलाना चांगले शिक्षण द्यावे असा चंग बांधून मंजुतार्इंनी मिळेल ते काम करण्याची हौस बाळगली. कपड्यांची शिलाई, शेतमजुरी यापासून लग्नसमारंभातही मजूर बनून काम केले. कधीकधी उपाशीही झोपी गेले. मात्र पोटच्या गोळ्यांना उपाशी ठेवण्याचे धाडस नव्हते. काम करण्याची सतत प्रेरणा पतीकडून मिळत राहायची. मंजुतार्इंचे शिक्षण आठवीपर्यंतचे तर पती विजय यांचे शिक्षण पदवी (अर्धवट) राहिलेले. शिक्षण कमी असल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत कायमस्वरुपी प्राप्त झाले नाही. मंजुतार्इंनी अहोरात्र कष्ट करून दोन मुली व मुलाला शिक्षणाकडे वळविले. निधी नावाची मोठी मुलगी आज एमटेकचे शिक्षण घेत आहे तर जुही व मुलगा अमोल हे दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. आजघडीला मंजुताई या शरीराने थकल्या असल्या तरी कुटुंब घडविण्याच्या जिद्दीने कायम आहे. महिला ही अबला नसून सबला आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मंजूताई. घरोघरी भांडेधुणी, शेतमजुरी तथा कष्ट करणाऱ्या महिलासमक्ष मंजूताई या आदर्श ठरल्या आहेत

Web Title: Help ease the journey of 'Manjutiai' from struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.