शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धो...धो बरसला; दोन तासात १०० मिमी पावसाची नोंद

By युवराज गोमास | Updated: September 22, 2023 15:27 IST

धान पिकांचे नुकसान : शेतशिवार जलमय, घरादारात शिरले पाणी

भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारला सकाळी १०:०० वाजतापासून १२.०० वाजतापर्यंत धो...धो पाऊस बरसला. दोन तासात १०० मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे शेतशिवार जलमय झाले. घरादारात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. कौलारू घरांचे नुकसान झाले. अनेकठिकाणी घरे व गुरांच्या गोठ्याची पडझड झाली. लोंबीवर असलेले हलके धान अतिवृष्टीने जमिनीवर लोळले. तर भारी धान पिकाचा फुलोरा झडल्याने उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पाऊस केव्हा थांबणार, याचीच चिंता शेतकऱ्यांत आहे.

जिल्ह्यात दोन आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील ४ मध्यंम, ३१ लघु प्रकल्प, २८ मामा तलाव प्रकल्पांच्या जलसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. आधीच तुडूंब भरलेली मामा तलाव, लघु प्रकल्प व मध्यंम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी ११०४.३ मिलिमीटर आहे. तर सध्यास्थितीत १०६० मिलिमिटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. पडलेल्या पावसाची टक्केवारी ९६ इतकी आहे. आणखी काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यास खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याचा अंदाज आहे. तर सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. 

गत आठवड्यात धरण व कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने पीके नेस्तनाबूत झाली होती. त्या त्रासदीत सध्या होत असलेल्या मुसळधार पाऊसाने आणखी भर पडली आहे. वरूण राजाला आता तरी थांब, अशी विनवणी शेतकरी करतांना दिसून येत आहेत.

तालुकानिहाय पडलेला पाऊस व टक्केवारी

तालुका - पडलेला पाऊस - टक्केवारीभंडारा - १०४२.२ - ९४.९मोहाडी - ९४३.० - ९४तुमसर - ९२९.१ - ९०.४पवनी - ११७६.१ - १०९९साकोली - १०२६.२ - ८५,९लाखांदूर - १३८८.४ - १३४.१लाखनी - ९३९.८ - ९१.५एकूण जिल्हा - १०६०.३ - ९६.०

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांची स्थिती

टक्केवारी - मध्यम लघु प्रकल्प - मामा तलाव - एकूण० ते २५ - ०० - ०० - ०० - ००२५ ते ५० - ०० - ०५ - ०४ - ०९५० ते ७५ - ०१ - ०६ - ०७ - १४७५ ते ९९ - ०० - ०९ - ०७ - १६१०० - ०३ - ११ - १० - २४एकूण ०४ ३१ २८ ६३

वैनगंगा दीड मिटरने खाली

जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असला तरी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी गाठलेली नाही. वैनगंगा धोक्याच्या इशाऱ्यापासून दीड मीटरने खाली आहे. कारधा येथील वैनगंगेची धोका पातळी २४५ मीटर असून सध्या नदीची पातळी २४३.५७ मीटर इतकी आहे. सध्या गोसे धरणात उपयुक्त जलसाठा ३६६.९३ दशलक्ष घनमीटर असून टक्केवारी ४९.५७ इतकी आहे. बावनथडी धरणातील उपयुक्त जलसाठा २२६.३१ दशलक्ष घनमीटर असून टक्केवारी ८८.८५ आहे.

गोसेचे गेट उघडले अर्धा मीटरने

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच धापेवाडा धरणाचे सर्व गेट खुले आहेत. गोसे धरणाचे १५ गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. १८३७.१७ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर बावणथडी धरणाचे सर्व गेट बंद आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसbhandara-acभंडारा