निधी अफरातफर प्रकरणी सुनावणी आज

By Admin | Updated: April 21, 2017 00:40 IST2017-04-21T00:40:28+5:302017-04-21T00:40:28+5:30

चौकशी होऊन आणि चौकशीअंती सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक हे दोषी आढळूनही चार महिने लोटूनही दोषींवर कारवाई झाली नाही.

Hearing of the filing of the lump sum case today | निधी अफरातफर प्रकरणी सुनावणी आज

निधी अफरातफर प्रकरणी सुनावणी आज

जि.प.अध्यक्षांच्या गावातील प्रकरण : माहितीच्या अधिकारातून भ्रष्टाचाराचा भंडाफोड
भंडारा : चौकशी होऊन आणि चौकशीअंती सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक हे दोषी आढळूनही चार महिने लोटूनही दोषींवर कारवाई झाली नाही. सुनील चाफले यांनी दोषींवर कारवाई आणि विकासकामासाठी आलेल्या रक्कमेची वसुली करावी, अन्यथा आत्मदहन कण्याचा इशारा प्रशासनाला दिला. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी २१ एप्रिलला मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या दालनात होणार आहे.
तालुक्यातील मुरमाडी/तूपकर येथील सरपंच प्रमिला रामचंद्र चौधरी व तत्कालीन ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी गावातील विकासकामासाठी येणाऱ्या निधीचा संगनमत करून गैरवापर करून अपहार केल्याचे निदर्शनास येत आहे. तत्कालीन ग्रामसेवक हे मुरमाडी/तुपकर आणि रामपुरी या दोन्ही गावाचा ग्रामसेवक म्हणून अतिरिक्त कारभार असतांना अनेक गैरकारभार केल्याचे आढळून येते. नाली, विहीर, आवरभिंत बांधकाम अशा प्रकरणांमध्ये त्यानी सरपंचाच्या संगनमताने गैरकारभार केल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट होत आहे. चौकशी होऊन आणि चौकशीअंती सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक हे दोषी आढळूनही चार महिने लोटूनही दोषींवर कारवाई झाली नाही. दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुरमाडी/तुपकर ग्रामपंचायत सदस्य सुनीत चाफले यांनी २७ एप्रिलला जिल्हा परीषद भंडारा येथे आत्मदहन करण्याचा इशारा शासनाला दिला आहे.मुरमाडी/तुपकर आणि रामपुरी या दोन्ही गावाचा ग्रामसेवक म्हणून अतिरिक्त कारभार असतांना ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी २०१५-१६ च्या काळात श्रीकृष्ण भोयर, हिवराज निम्बार्ते, विश्वनाथ नेवारे, सुभाष निम्बार्ते, नवनीत देशमुख अशी पाच मजूर ४५ दिवस दोन ग्रामपंचायतीमध्ये कामावर दाखवून १३ व्या वित्त निधी रस्ता खडीकरण आणि ग्रामनिधीचे ११,२५० रुपयांची अफरातफर केल्याचे चौकशी अंती लक्षात आले होते. यावर गट विस्तार अधिकारी ब्राह्मणकर यांनी निष्कर्ष काढून एकच मजूर एकाच दिवशी दोन्ही ग्रामपंचायतीच्या कामावर जाऊ शकत नाही आणि त्या सर्व मजुरांचे बयान घेतले असता त्यानी रामपुरी येथे कामावर गेले नाही, असे नोंदविले होते. याउपरही ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी नियम १९६४ नुसार शिस्त भंग केला आणि अपहार रक्कमेची वसुल करावी असे ठरविले असताना सुद्धा रक्कम जमा केली नाही. तसेच दत्ता पोहरकर यांनी त्या पाचही मजुरांची खोटी सही अंगठे घेऊन रक्कमेचा अपहार केला म्हणून यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांनी केली.लाखनी खंड विकास अधिकारी बागडे, विस्तार अधिकारी चकोले, गट विस्तार अधिकारी ब्राह्मणकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. मात्र अद्यापर्यत दोषींवर करवाई झाली नाही, म्हणून सुनील चाफले यांनी उभा केलेला लढा यशस्वी होईल काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगरप्रतिनिधी)

Web Title: Hearing of the filing of the lump sum case today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.