कार्यकुशलतेसाठी सुदृढ आरोग्य महत्त्वाचे
By Admin | Updated: January 15, 2016 01:21 IST2016-01-15T01:21:49+5:302016-01-15T01:21:49+5:30
आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. व्यक्तिच्या कार्यकुशलतेसाठी आरोग्य महत्वाचे आहे.

कार्यकुशलतेसाठी सुदृढ आरोग्य महत्त्वाचे
कुरेशी यांचे प्रतिपादन : साकोलीत युवा सप्ताहाचे आयोजन
साकोली : आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. व्यक्तिच्या कार्यकुशलतेसाठी आरोग्य महत्वाचे आहे. आजच्या युवा तरुणांमध्ये आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द तयार व्हावी, यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकसीत सुदृढ, निरोगी, उत्साही युवा पिढीतुन निरोगी व सुसंस्कृत नागरिक मिळतील त्यामुळे सुदृढ आरोग्य हीच उत्तम देणगी आहे, असे प्रतिपादन क्रीडा संघटक शाहिद कुरैशी यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने स्थानिक कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात आयोजित स्वामी विवेकानंद जन्मदिवस राष्ट्रीय युवादिन, युवा सप्ताहात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश मस्के होते. अतिथी म्हणून प्रा. संजय पारधी उपस्थित होते. यावेळी कुरैशी म्हणाले, सुदृढता टिकवून ठेवायची असेल तर आहारात गोड पदार्थांचा वापर करु नये. सकाळच्या न्याहारीत अंकुरित कडधान्य, भाज्यांचा समावेश असावा. तरुणांनी शिस्तप्रिय, संतुलित व निरोगी जगावे, यासाठी शाीररिक सुदृढता उत्तम असावी. स्नायूची ताकद, सामर्थ्य, शक्ती, लवचिकता, चपळता आणि हृदय व श्वसनसंस्थेची कार्यक्षमता यांचा शारीरिक सुदृढतेमध्ये समावेश होतो. यावेळी अतिथींची भाषणे झाली. संचालन प्रथम दुबे यांनी तर आभार पारधी यांनी मानले. कार्यक्रमाल विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद जयंती
साकोली : बाजीरावजी करंजेकर फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दामोदर गौपाले होते. यावेळी पाहुणे म्हणून प्रा. आतिश शहारे, प्रा. चंद्रशेखर चकोले उपस्थित होते. याप्रसंगी रासेयोच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या जयंतीचे महत्व विषद केले. प्रास्ताविक रासेयो विभागप्रमुख प्रा. भोजराज सातपूते, संचालन व आभार प्रदर्शन अनिल झिंगरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)