आरोग्य सहायिकेचे स्थानांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:31 IST2016-04-23T00:31:54+5:302016-04-23T00:31:54+5:30

बालकांसाठी असलेल्या लसीविषयी दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून पहेला येथील कंत्राटी आरोग्य सहायिका वर्षा रामटेके ...

Healthcare Transfer | आरोग्य सहायिकेचे स्थानांतरण

आरोग्य सहायिकेचे स्थानांतरण

दणका लोकमतचा : गोपनीयता भंगप्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी होणार, कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागितला अहवाल
भंडारा : बालकांसाठी असलेल्या लसीविषयी दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून पहेला येथील कंत्राटी आरोग्य सहायिका वर्षा रामटेके यांचे खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानांतरण करण्यात आले आहे. मात्र गोपनीय माहिती सार्वजनिक करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यांची लवकरच चौकशी होणार असून ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
आरोग्य सहाय्यिकेचा दुर्लक्षपणा व कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणूक या कारणावरून पहेला येथील कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. प्रकरण गंभीर असल्याने पहेला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठाकडे माहिती सादर केली होती. त्यानंतर डॉ.अश्विन रक्षमवार व तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा जुगनाके यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांचे बयान घेतले. नोंदविलेले बयान गोपणीय ठेवले जातात. मात्र हे बयान आरोग्य केंद्राच्या ई-मेलवर पाठविण्यात आले. त्यामुळे ती माहिती सार्वजनिक झाली. याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत तालुका आरोग्य अधिकारी जुगनाके व वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता कविश्वर यांची नियुक्ती केली. समितीने चौकशीचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दाखविला. मात्र बयान अर्धवट असल्यामुळे खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधितांचे बयाणांचे रेकॉर्डिग केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले. मात्र कारवाई करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे दिसताच पहेला येथील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष सुभाष आजबले यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. कर्मचाऱ्यांनीही सामूहिक बदलीची मागणी वरिष्ठांकडे निवेदनातून केली होती. चौकशी समितीने २० एप्रिल रोजी अहवाल आरोग्य विभागाकडे सादर केला. 'लोकमत'ने यासंबंधीचे वृत्त २१ व २२ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले. यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागी झाले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Healthcare Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.