धूळ प्रदूषणाचा आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:00 AM2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:37+5:30

रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, किंवा जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारी लाखनीवासीयांमध्ये निर्माण झाल्या आहेत. वाहनांची वाढलेली संख्या व रस्त्यावरील खोदकाम यामुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

Health risks of dust pollution | धूळ प्रदूषणाचा आरोग्याला धोका

धूळ प्रदूषणाचा आरोग्याला धोका

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम कंपनीचे दुर्लक्ष : लाखनी येथील फ्लायओव्हरचे बांधकाम

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखनी शहर व मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गावर फ्लायओव्हरचे काम धडाक्यात सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यावर फ्लायओव्हरचे पिल्लर तयार करण्याचे काम पूर्णत्वात आले आहे. दीड वर्षापासून फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. सर्व्हिस रस्त्यावरील धुळीमुळे जनता त्रस्त झाली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, किंवा जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारी लाखनीवासीयांमध्ये निर्माण झाल्या आहेत. वाहनांची वाढलेली संख्या व रस्त्यावरील खोदकाम यामुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.
सर्व्हिस रोड अवजड वाहतूकीमुळे उखडलेले आहेत. अवजड वाहन सर्व्हिस रोडवरुन चालत असल्याने इतर दुचाकीस्वारांना सावधतेने वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच धुळीमुळे रस्ता माखलेला असतो. त्याचा परिणाम अपघातावर होताना दिसतो आहे.
अत्याधिक धुळीमुळे, धुळीचे कण फक्त काही वेळ सर्व्हिस रोडवर पाणी टाकले जाते. त्यातही मोठ्या प्रमाणात कुचराई केली जात असून फ्लायओव्हरच्या कामाला जनता कंटाळली आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा विचार केला जात नाही.
फ्लायओव्हरचे काम सुरु असल्याने मधला रस्ता बंद केला आहे. सर्व्हिस रोडवर वाहने ठेवली जातात. सर्व्हिस रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागतो आहे. जेएमसी कंपनीद्वारे रस्ता रुंदीकरण व नाल्या तयार करण्याची जबाबदारी आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीने सहा सात वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले. परंतु शहरातील मार्गावरुन अपघाताचे प्रमाण वाढलयाने फ्लायओव्हरचे काम मंजूर केले आहे.

लाखनीतील चौक धोकादायक
लाखनीतील मुरमाडी हद्दीतील कुमार पेट्रोल पंपसमोरील चौक सर्वाधिक धोकादायक आहे. येथील रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही, तहसील कार्यालयासमोरील चौक वर्दळीच्या असून शाळा कॉलेजात जाण्याचा मार्ग व तेथील प्रवासी निवारा यामुळे येथे सतत गजबज असते. बाजार रोड चौक लाखनीचे मध्यबिंदू आहे. चौकात काळीपिवळी ऑटो उभे असतात. सर्व्हिस रोडवर दुकाने थाटलेली आहेत. जयस्तंभ चौकातून सेलोटी, सिपेवाडा, लाखोरी येथे जाणारी रस्ते आहेत. यामुळे वाहतुक मोठ्या प्रमाणात असते, बसस्थानकाला समोरील चौकात काळीपिवळी ऑटो उभी असतात. या चौकात जेएमकंपनीचे वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी आहेत. परंतु ते प्रशिक्षीत नाही. सोबत रस्त्याची कामे सुरु असल्याने मधला रस्ता बंद करुन सर्व्हिस रोडवरुन वाहतुक सुरु करावी लागते. पोलीस विभागाचे वाहतुक कर्मचारी काही वेळ चौकात असतात. चौकाच्या सुरक्षिततेकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.

Web Title: Health risks of dust pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.