रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

By Admin | Updated: April 10, 2015 00:39 IST2015-04-10T00:39:04+5:302015-04-10T00:39:04+5:30

मुंबई हावडा रेल्वे मार्गावर नागपूर ते आमगाव दरम्यान प्रवासी रेल्वे गाड्यात शेकडो अनधिकृत व्हेंडर्स रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादाने खाद्यपदार्थ तथा शीतपेयांची सर्रास विक्री करीत आहेत.

Health risk of railway passengers | रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

तुमसर : मुंबई हावडा रेल्वे मार्गावर नागपूर ते आमगाव दरम्यान प्रवासी रेल्वे गाड्यात शेकडो अनधिकृत व्हेंडर्स रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादाने खाद्यपदार्थ तथा शीतपेयांची सर्रास विक्री करीत आहेत. परवानेधारक व्हेंडर्सची संख्या ययथे अत्यल्प आहे. निकृष्ट खाद्यपदार्थ तथा शीतपेयांअभावी रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नियमावर बोट ठेवणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रेल्वे प्रशासन आरोग्याकरिता उत्तम गुणवत्ताप्राप्त खाद्यपदार्थ देण्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात अनधिकृत व्हेंडर्स सर्रास प्रवाशी रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ व शीतपेयांची तपासणी विना विक्री करीत आहेत. अधिकृत व्हेंडर्सला रेल्वे प्रशासन ड्रेस कोड दिला आहे. अधिकृत व्हेंडर्स ड्रेस कोडचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अधिकृत व अनधिकृत व्हेंडर्स कोण आहेत याची ओळख करता येत नाही.
नागपूर ते आमगाव दरम्यान शेकडो अनधिकृत व्हेंडर्स मागील अनेक महिन्यापासून खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत. जलद व लोकल गाड्यातून ते खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत. जलद व लोकल गाड्यातून ते खाद्यपदार्थांची विक्री करतात. अनधिकृत व्हेंडर्सची या रेल्वे मार्गावर मक्तेदारी सुरु आहे. रेल्वे प्रशासनातील रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत हा विभाग येतो. त्या विभागाच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा येथे सर्रास सुरु आहे.
आरक्षित डब्ब्यात रेल्वे प्रशासनाने पेंटरीकार हा डब्बा असतो. पेंटरी कारमधील कर्मचारी हे अधिकृत असतात. परंतु त्यांची संख्या कमी असते. दिवसा सर्वसामान्य ते इतर खाद्यपदार्थांची विक्री करीत नाही. दिवसा व रात्री भोजनाचा आॅर्डर ते घेतात. इतर खाद्यपदार्थ व शीतपेयांची ते सामान्यत: विक्री करीत नाही. उन्हाळ्यात प्रवाशी रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असतात. खाद्यपदार्थांत गुंगीचे औषध देणे व प्रवाशांना लुबाडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शीतपेय, बाटलीबंद पाणी, पाणी पाऊचसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ते विक्री करतात. प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर तर प्रश्नचि न्ह निश्चित आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता अनधिकृत व्हेंडर्स प्रकरणात केवळ रेल्वे पोलीस कारवाई करू शकतात असे उत्तर देण्यात आले. या अनधिकृत व्हेंडर्सवर नागपूर, गोंदिया रेल्वे पोलीस कारवाई करू शकते. परंतु त्यांच्या डोळ्यादेखत सर्रास हा गोरखधंदा सुरु असल्याने निश्चितच त्यात अर्थकारण दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Health risk of railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.