वाहनांच्या धुरामुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: October 4, 2015 01:25 IST2015-10-04T01:25:46+5:302015-10-04T01:25:46+5:30
वाहनांमध्ये होणाऱ्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

वाहनांच्या धुरामुळे आरोग्य धोक्यात
वरठी : वाहनांमध्ये होणाऱ्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहराकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोत रॉकेलचा सर्रास वापर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील आॅटो चालक खेड्यातील विक्रेत्यांकडून जादा पैसे देऊन रॉकेलची खरेदी करतात. हे रॉकेल इंधन म्हणून आॅटोत वापरण्यात येते. या रॉकेलमुळे वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आता विविध वाहनांमध्ये इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर रॉकेलचा वापर होत आहे. ट्रक आणि आॅटो त्यात आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात केरोसीन विक्रेते सामान्य जनतेला रॉकेल नाही म्हणून सांगतात. अनेकदा त्यांच्या वाट्याचे रॉकेल वाहनधारकांना विकतात. वाहनांतून निघणाऱ्या रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना दमा व श्वसनाच्या आजारांनी ग्रासले आहे.डिझेलचे दर वाढल्याने आॅटो चालकांनी रॉकेलकडे धाव घेतली आहे. कमी पैशात जादा उत्पन्न होत असल्याने आॅटो चालक रॉकेल विक्रेत्यांकडे वळत आहे.आॅटो चालकांना मात्र जादा पैशात रॉकेल उपलब्ध करून देत आहेत. (वार्ताहर)