आरोग्य ही महान संपत्ती
By Admin | Updated: March 5, 2016 00:37 IST2016-03-05T00:37:16+5:302016-03-05T00:37:16+5:30
जीवन सुरळीत रहावे यासाठी आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. आरोग्यही महान संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असे प्रतिपादन जुल्फी शेख यांनी केले.

आरोग्य ही महान संपत्ती
ब्रेस्ट कॅन्सरविषयक चर्चासत्र : जुल्फी शेख यांचे प्रतिपादन
भंडारा : जीवन सुरळीत रहावे यासाठी आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. आरोग्यही महान संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असे प्रतिपादन जुल्फी शेख यांनी केले.
रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय येथे ब्रेस्ट कॅन्सर विषयक चर्चासत्र घेण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होेते. उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, डॉ. सुचित्रा मेहता, प्रदीप परतेकी, हेमंत ब्राम्हणकर आदी उपस्थित होते.
विनिता साहू यांनी कॅन्सर आजारासाठी जागृतीची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्वत:च्या क्षमतेची जाणिव ठेवणे आवश्यक आहे. यावेळी कॅन्सर पिडीतांनी कॅन्सर आजाराच्या उपाययोजने विषयी अभिनयपुर्ण लघु नाटिका सादर केले. डॉ. सुचित्रा मेहता यांनी सचित्र सादरीकरणाव्दारे ब्रेस्ट कॅन्सर आजाराविषयी माहिती दिली. लक्षणे, उपचार, गर्भाशयाचा कॅन्सर याचे निदान व जागृतीविषयी माहिती दिली. डॉ. अर्पणा जक्कल यांनी कॅन्सरविषयी तपासणी व निदान सांगितले.
चर्चासत्राचे आयोजन मनोहरभाई पटेल अकॅडेमी, इक्वीटस, मॉयक्रो फायनान्स, रेवाबेन मनोहरभाई पटेल राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सामान्य रुग्णालय अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. संचालन डॉ. प्रा. शिरीष नखाते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. किशोरदत्त पाखमोडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)