लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील बचपन प्ले स्कूलच्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मानसिकदृष्ट्या खचल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले होते.महेंद्र मनोहर मेश्राम (३४, रा.पळसपाणी) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. पाच वर्षापूर्वी त्यांनी येथील एकोडी मार्गावर बचपन प्ले स्कूल सुरु केले होते. या शाळेचे ते स्वत: संचालक आणि मुख्याध्यापकही होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत आले. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोबाईलवर बोलत ते शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील रुमकडे गेले. मात्र बराच वेळ झाला तरी महेंद्र मेश्राम खाली का आले नाही म्हणून काही शिक्षकांनी वर जाऊन पाहिले. तेव्हा ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.शिक्षकांनी तात्काळ त्यांना खाली काढून साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अविवाहित असलेल्या महेंद्र मेश्राम यांच्या खिशात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आपण बऱ्याच दिवसांपासून मानसिकदृष्ट्या खचलो होतो. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले आहे. या घटनेची माहिती होताच अनेकांंनी साकोली उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. अविवाहित असलेल्या महेंद्र मेश्राम यांनी परिश्रमातून बचपन प्ले स्कूल साकोली येथे सुरु केले होते. मात्र अचानक त्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास साकोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.शैक्षणिक क्षेत्रात खळबऴउच्च शिक्षित महेंद्र मेश्राम यांनी आपल्या शाळेतच गळफास लावून आत्महत्या केल्याने साकोलीच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या महेंद्र मेश्राम यांनी शाळा नावारुपास आणली होती. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या केली. त्यांच्या मागे आईवडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी त्यांचे मुळ गाव पळसपाणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्याध्यापकाची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST
शाळेचे ते स्वत: संचालक आणि मुख्याध्यापकही होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत आले. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोबाईलवर बोलत ते शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील रुमकडे गेले. मात्र बराच वेळ झाला तरी महेंद्र मेश्राम खाली का आले नाही म्हणून काही शिक्षकांनी वर जाऊन पाहिले. तेव्हा ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.
मुख्याध्यापकाची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देसाकोलीची घटना। खिशात सापडली चिठ्ठी